स्मार्टफोनवर पॉर्न पाहण्यात भारत पहिल्या क्रमांकावर

देशात स्मार्टफोन आणि मोबाईल इंटरनेट डेटा वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

Updated: Jan 2, 2020, 10:57 PM IST
स्मार्टफोनवर पॉर्न पाहण्यात भारत पहिल्या क्रमांकावर

मुंबई : देशात स्मार्टफोन आणि मोबाईल इंटरनेट डेटा वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचबरोबर स्मार्टफोनवर पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. २०१९ या वर्षात ८९ टक्के लोकांनी मोबाईल फोनवरून पॉर्न बघितल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. २०१७ साली हा आकडा ८६ टक्के होता.

सर्वाधिक पॉर्न पाहणाऱ्यांच्या यादीत अमेरिका ८१ टक्क्यांसह दुसऱ्या, ब्राझील ७९ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. डेटा प्लान स्वस्त झाल्यामुळे आणि स्मार्टफोनच्या किंमती कमी झाल्यामुळे भारतात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे, असं हा रिपोर्ट सांगतो.

आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार केला तर ४ पैकी ३ जण मोबाईलवर पॉर्न बघतात. डेस्कटॉप आणि लॅपटॉपच्या तुलनेत लोकं स्मार्टफोनवर पॉर्न पाहणं पसंत करत आहेत. एडल्ट इंटरनेट वेबसाईट पॉर्नहबने हा दावा केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या वेबसाईटचा मोबाईल ट्रॅफिक ७७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. २०१८च्या तुलनेत हा ट्रॅफिक १० टक्क्यांनी वाढला आहे.

काहीच दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंटरनेटवरच्या पॉर्न साईटवर बंदी घालण्याची मागी केली होती. यासाठी नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहीलं होतं. इंटरनेटवरच्या अश्लिल गोष्टी तरुण आणि लहान मुलं मोठ्या प्रमाणावर बघत आहेत. महिलांवर होणारे अत्याचार वाढण्याला या गोष्टीही जबाबदार आहेत, असं नितीश कुमार या पत्रात म्हणाले होते.