WhatsApp Edit Messages Feature: व्हॉटअॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. स्मार्टफोन असलेल्या सर्व व्यक्तींच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप पाहायला मिळतं. वाढती लोकप्रियता आणि मागणी पाहता व्हॉट्सअॅप नवनवीन फीचर्स अपडेट करत असतं. WABetaInfo च्या ताज्या रिपोर्टनुसार, WhatsApp वर लवकरच एक नवीन फीचर येणार आहे. व्हॉट्सअॅप आणखी फीचरवर काम करत असून यामुळे युजर्स पाठवलेला मेसेज एडीट करू शकणार आहेत. या फीचरची माहिती WABetaInfo ने स्क्रीनशॉटद्वारे शेअर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की जास्त तपशील समोर आलेला नाही, परंतु हे फीचर Twitter च्या Edit Button प्रमाणे काम करते. चला त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊया..
WhatsApp चे एडिट फीचर ट्विटरच्या एडिट बटणाप्रमाणे काम करेल. व्हॉट्सअॅप युजर्सने एकदा मेसेज एडिट केल्यावर समोरच्या व्यक्तीला पहिल्या मेसेजमध्ये काय लिहिले आहे ते दिसणार नाही. पण मेसेज एडिट झाला आहे हे त्यांना नक्कीच कळेल. मेसेजमधील एका प्रॉम्प्ट संकेतामुळे मेसेज एडीत केला असल्याचं कळून येईल.
Tips And Tricks: WhatsApp वर तुम्हाला कोणी ब्लॉक केलंय, या सोप्या ट्रिकने शोधा
या फीचरची सध्या चाचणी केली जात आहे आणि हे व्हॉट्सअॅप अँड्रॉइड बीटा अपडेट व्हर्जन 2.22.20.12 वर दिसले आहे. लवकरच iOS च्या बीटा व्हर्जनवरही हे फीचर पाहता येणार आहे. व्हॉट्सअॅप एडिट फीचर सर्व युजर्ससाठी कधी रिलीझ होईल हे अद्याप कळलेले नाही.