तुमच्या स्मार्टफोनवरील छोटासा होल करतो असं काम! फीचर्समुळे रोजच्या कटकटीतून होईल सुटका

जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये वरच्या बाजूला एक छोटासा होल असेल तर तुमचं काम सोपं झालंच समजा.

Updated: Aug 7, 2022, 02:20 PM IST
तुमच्या स्मार्टफोनवरील छोटासा होल करतो असं काम! फीचर्समुळे रोजच्या कटकटीतून होईल सुटका title=

Smartphone Remote Access: सध्याचा काळ हा डिजिटल युग म्हणून ओळखलं जातं. प्रत्येक गोष्टींसाठी गॅझेट उपलब्ध आहे. डिजिटल क्रांतीमुळे आपल्या बर्‍याच अडचणी सोडवल्या जातात. तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्याला आवश्यक अशा सर्व गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या सोयी आपल्या हाताशी मिळतात. यात डिजीटल डिव्हाईचा वाटा खूप मोठा आहे.तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर एकदा व्यवस्थित निरखून पाहा. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये वरच्या बाजूला एक छोटासा होल असेल तर तुमचं काम सोपं झालंच समजा. या डॉटचा उपयोगामुळे तुमची रोजच्या कटकटीपासून सुटका होईल. हे फीचर मोस्ट ऑफ द चायना फोनमध्ये दिलं आहे. हा छोटासा होल साधासुधा नसून आयआर ब्लास्टर आहे. 

आयआर ब्लास्टरमधून इंफ्रारेड वेव्स फेकले जातात. तुमचं टीव्ही आणि एसीचं रिमोर्ट काम करतं अगदी तसंच.. या इंफ्रारेड वेव्सच्या माध्यमातून टीव्ही आणि एअर कंडीशनर अॅक्सेस करू शकता. एकदा तुम्हाला या फीचर्सबद्दल कळलं की, तुम्ही तुमच्या घरातील गॅझेट हातातील स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑपरेट करू शकता. यासाठी तुम्हाला हरवलेला रिमोट शोधण्याची गरज नाही. तुमच्या घरगुती उपकरणांचा रिमोट काम करत नसेल तर हे फीचर अतिशय उपयुक्त आहे.

जर तुम्हाला तुमच्या घरातील टीव्ही आणि एअर कंडिशनर नियंत्रित करण्यासाठी आयआर ब्लास्टर वापरायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आयआर ब्लास्टर अॅप डाउनलोड करावे लागेल. काही स्मार्टफोनमध्ये हे अॅप प्री-इंस्टॉल केलेले असते परंतु तुमच्या फोनमध्ये हे अॅप नसल्यास, तुम्ही Google Play Store वरून डाउनलोड करू शकता. यानंतर हे अॅप डिव्हाइससह जोडणे आवश्यक आहे. काही मिनिटांच्या प्रोसेसनंतर तुम्ही स्मार्टफोनवरून तुमच्या घरातील उपकरणं ऑपरेट करू शकता.