Jio 5G ला Airtel ची तगडी टक्कर; Intel सोबत भागीदारी करून 5G सेवा विस्तारणार

 भारतातील टेलिकॉम सेक्टरमधील मोठी कंपनी एअरटेलने आज अमेरिकेची चिपमेकर कंपनी Intel सोबत भागीदारीची घोषणा केली आहे.

Updated: Jul 22, 2021, 07:45 AM IST
Jio 5G ला Airtel ची तगडी टक्कर; Intel सोबत भागीदारी करून 5G सेवा विस्तारणार title=

मुंबई : भारतातील टेलिकॉम सेक्टरमधील मोठी कंपनी एअरटेलने आज अमेरिकेची चिपमेकर कंपनी Intel सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. देशात 5G नेटवर्क स्थापित करण्यासाठी एअरटेलचे हे मोठे पाऊल मानले जात आहे. एअरटेलच्या आधी Jioने Intel सोबत भागीदारीची घोषणा केली होती. Intel Capital ने 2020 मध्ये 1894 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह Jio च्या इक्विटी स्केटमध्ये 0.39 टक्के भागीदारी विकत घेतली होती. 

5G च्या बाबतीत एअरटेलला जिओच्या एक पाऊल देखील मागे राहायचे नाही. एअरटेल आणि इंटेलच्या नव्या भागीदारीमध्ये vRAN/O-RAN टेक्नॉलॉजीच्या मदतीने 5G रोडमॅप बनवायला मदत करणार आहे. लाइन नेटवर्कवर 5G चा लाइन डेमो देणारा एअरटेल भारतातील पहिला टेलिकॉम ऑपरेटर आहे. या डेमो दरम्यान, नेटवर्कने 1Gbps ची दमदार स्पीड मिळवली होती. एअरटेलने इंटेलच्या थर्ड जनरेशन Xeon Scalable प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. 

भारती एअरटेलचे सीटीओ रणदीप सेखॉन म्हणाले की, '5Gसाठी वेगाने विस्तारत असलेल्या भागीदार इकोसिस्टमचा भाग म्हणून इंटेलच्या भागीदारीने एअरटेलला आनंद झाला आहे. इंटेलची अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभव एअरटेलच्या जागतिक स्तरावरील 5G ​​सेवांसह भारताची सेवा देण्याच्या मोहिमेस मोठ्या प्रमाणात योगदान देईल. ग्लोबल 5 जी हब म्हणून भारताची क्षमता वाढवण्यासाठी आम्ही इंटेल आणि देशांतर्गत कंपन्यांसमवेत काम करण्यास उत्सुक आहोत."