Pegasus Spyware : काय आहे पेगासस स्पायवेअर? हे स्पायवेअर कसं काम करतं?

सध्या पेगासस स्पायवेअरची सगळीकडेच चर्चा आहे.

Updated: Jul 19, 2021, 10:04 AM IST
Pegasus Spyware : काय आहे पेगासस स्पायवेअर? हे स्पायवेअर कसं काम करतं? title=

मुंबई : सध्या पेगासस स्पायवेअरची सगळीकडेच चर्चा आहे. इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेलं पेगासेस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इस्रायली फर्म पेगाससद्वारे आपल्या देशातील काही मंत्री तसंच पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले असल्याचा दावा करण्यात येतोय.

पेगासस हे एक स्पायवेअर आहे. इस्त्रायलच्या NSO ग्रुपने हे स्पायवेअर बनवलं आहे. हे स्पायवेअर ज्यांच्या फोनमध्ये टाकण्यात आल्याची शक्यता असलेल्यांची एक यादी सध्या लीक झाल्याची माहिती आहे. मात्र हे पेगासस स्पायवेअर नेमकं काय आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? तर आज जाणून घेऊया हे पेगासस स्पायवेअर नेमकं काय आहे आणि ते कसं काम करतं.

काय आहे पेगासस स्पायवेअर (Pegasus Spyware)?

पेगासस स्पायवेअर हे इस्रायलच्या NSO ग्रुपने तयार केलेलं आहे. 2016 मध्ये ही कंपनी चर्चेत आली कारण त्यावेळी एका अरब कार्यकर्त्याला त्याच्या मोबाईलवर एक संशयास्पद मेसेज आला. त्याला हे वाटत होते की पेगाससद्वारे आयफोन युजर्सचे फोन हॅक केले जातायत. मात्र आयफोन कंपनीने iOSचं अपडेटेड व्हर्जन आणपेगाससद्वारे हॅक केल्या जाऊ शकणाऱ्या कमतरता दूर केल्या असल्याचं सांगितलं.

मात्र वर्षभरानंतर पेगासस स्पायवेअर हे अँड्रॉईड फोनही सहज हॅक करू शकतं असं समोर आलं. सायबर सुरक्षेबाबत संशोधन करणाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. फेसबुकने देखील NSO ग्रुपच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. फेसबुकच्या सायबर सुरक्षेविषयी संशोधन करणारे संशोधक Pegasus काय करतं आहे याची माहिती वारंवार घेत होते तेव्हा त्यांना हे लक्षात आलं के पेगाससद्वारे भारतातील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांची WhatsApp हॅक करण्यात आलं होतं. 

पेगासस स्पायवेअर कसं काम करतं?

ज्या व्यक्तीचा फोन हॅक करायचा आहे त्याला एक वेबसाईटची लिंक पाठवली जाते. ही लिंक ओपन झाली की पेगासस त्याच्या फोनमध्ये इन्स्टॉल होतं. शिवाय व्हॉईस कॉल सिक्युरीटी बग आणि व्हॉट्सएप यांच्या माध्यमातूनही पेगासस इन्स्टॉल केलं जाऊ शकतं.

पेगाससची सिस्टिम इतकी एडवांस आहे की युजरला मिसकॉल देऊन सुद्धा त्याचा फोन हॅक करता येऊ शकतो. संशोधकांच्या सांगण्याप्रमाणे, युझरच्या मोबाईलवर इन्स्टॉल झालं की त्याचे कॉल लॉग, व्हॉट्सएप चॅट पाहता येतात. व्हॉट्सएपचे मेसेज वाचणं, कॉल ट्रॅक करणं, युझरची अॅक्टिव्हिटी पाहणं या सगळ्या गोष्टी या पेगाससमुळे सहजरित्या केल्या जाऊ शकतात.