नवी दिल्ली : भारतीय टेलिकॉम इंडस्ट्री आजच्या घडीला कोणत्या युद्धभूमीपेक्षा कमी नाहीए. टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रोज नवनव्या ऑफर्स आणत आहेत. ४ जी बाजारात जियोने
जियोने ४ जी बाजारात वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर एअरटेलही आपली पकड मजबूत करण्यास यशस्वी झालीए.
जियोपेक्षा स्वस्त टॅरिफ प्लान देऊन एअरटेलने जोरदार टक्कर दिलीए. एकिकडे जियो आपल्या टॅरिफ प्लानची किंमत कमी करतेय तर त्याच्या तोडीला एअरटेल नवा प्लान आणतेय. जियोफोनला टक्कर देण्यासाठीही एअरटेलने पहिला स्मार्टफोन बाजारात आणून टक्कर देतयं.
एअरटेलने जियोला टक्कर देण्यासाठी ४४८ आणि ५०९ रुपयांचा प्लान मध्ये बदल केलाय. सध्या एअरटेलने ९३ रुपयांच्या प्लानमध्येही बदल करत त्याची मर्यादा वाढवलीय.
सध्या हा प्लान आंध्र प्रदेश आमि तेलंगणाच्या युजर्ससाठी उपलब्ध आहे.
९३ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणार १ जीबी ४ जी आणि १ जीबी ३ जी डेटासोबत अनलिमिटेड वॉइस कॉल फ्रि देत आहे. याला २८ दिवसांची वॅलिडिटी आहे.
याआधी या प्लानची वॅलिडिटी १० दिवसांची होती. डेटापेक्षा कॉलिंगचा वापर करणाऱ्यांसाठी हा प्लान जास्त उपयुक्त ठरणार आहे.
एअरटेल आणि जियोच्या प्लानला कोणत्या सिमा नाहीयेत. डेटाची स्पीड ठेवण्यासाठी युजर्सला 'अॅड ऑन पॅक' रिचार्ज करावा लागेल.