Airtel New Prepaid Plans | 'या' गोष्टी मिळणार फ्री, एअरटेलने लॉन्च केलेत 2 भन्नाट प्लॅन्स

फ्रिडम ऑफर म्हणून रिलायन्स जिओ ने प्रीपेड, पोस्टपेड आणि फायबरसोबतच ग्राहकांसाठी खास ऑफर्सच्या घोषणा केल्या. अशात प्रतिस्पर्धी टेलिकॉम ऑपरेटर भारती एअरटेलनेही त्यांना टक्कर देण्यासाठी दोन प्रीपेड प्लॅन्स बाजारात आणलेत

Updated: Aug 15, 2022, 07:05 PM IST
Airtel New Prepaid Plans | 'या' गोष्टी मिळणार फ्री, एअरटेलने लॉन्च केलेत 2 भन्नाट प्लॅन्स title=

Airtel new prepaid plans : एरटेलने आपल्या युजर्ससाठी 60 आणि 90 दिवसांच्या व्हॅलिडिटीचे दोन दमदार प्रीपेड प्लॅन्स बाजारात आणले. यामध्ये दररोज 1.5GB हाय स्पीड इंटरनेट डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि इतरही फायदे मिळू शकतात.  

फ्रिडम ऑफर म्हणून रिलायन्स जिओ ने प्रीपेड, पोस्टपेड आणि फायबरसोबतच ग्राहकांसाठी खास ऑफर्सच्या घोषणा केल्या. अशात प्रतिस्पर्धी टेलिकॉम ऑपरेटर भारती एअरटेलनेही त्यांना टक्कर देण्यासाठी दोन प्रीपेड प्लॅन्स बाजारात आणलेत. एअरटेलच्या या दोन प्लॅन्सची किंमत आहे 519 आणि 779 रुपये.    

या प्लॅन्समधून तुम्हाला काय मिळेल? 

Airtel च्या या दोन्ही प्रीपेड प्लॅन्समध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 1.5GB हायस्पीड डाटा, दररोज 100 SMS आणि इतरही लाभ ग्राहकांना मिळणार आहे. दोन्ही प्लॅन्स याआधीपासूनच त्यांच्या वेबसाई आणि एरटेल थँक्स ऍपवर लिस्टेड आहेत. सविस्तर जाणून घेऊयात AirTel ने लॉन्च केलेल्या नव्या प्लॅनबाबत.   
 
कसा आहे 519 चा प्लॅन (Airtel Rs 519 plan)

519 रुपयांच्या नव्या नवीन एअरटेलच्या प्लॅनची वैधता 60 दिवसांची आहे. कंपनी या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, प्रतिदिन 1.5GB हायस्पीड डाटा, दररोज 100 SMS ची सुविधा मिळते. यासोबतच टेलिकॉम ऑपरेटर एअरटेलने थँक्स बेनिफिट्स देखील ग्राहकांना देऊ केलेत. यामध्ये फ्रीमध्ये अपोलो 24/7, हॅलोट्यून्स, विंक म्युझिक आणि फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक यांचा समावेश आहे.      

कसा आहे 779 चा प्लॅन (Airtel Rs 779 plan)

नुकत्याच लॉन्च झालेल्या AirTel च्या 779 च्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 1.5GB दररोजचा डेटा आणि सोबतच एकूण  135 डेटा दिला जातो. यामध्ये तुम्हाला 519 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारे सर्व लाभ मिळतात. या प्लॅनची वैधता 90 दिवसांची आहे. 

Airtel new prepaid plan of rs 519 and rs 779 with unlimited calling and high speed data