नवी दिल्ली : मेरा पहला स्मार्टफोन दूरसंचार सेवा प्रदाता भारती एअरटेल मोटरोला आणि लेनोव्हाच्या निवडक 4जी स्मार्टफोन्सवर २००० रुपयांचा कॅशबॅक मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मोटरोलाचे दोन प्रसिद्ध स्मार्टफोन्स मोटो सी, मोटो ई ४ आणि लेनोव्हाच्या के ८ या फोनवर ही ऑफर उपलब्ध आहे. या ऑफरअंतर्गत मोटो सी ३९९९ रुपयांत, मोटो ई४ ६४९९ रुपयांत तर लेनोव्हा के ८ नोट १०,९९९ रुपयांत उपलब्ध आहे.
भारतीय एअरटेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत हा स्मार्टफोन पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. एअरटेल नोकीया २ किंवा ३ स्मार्टफोन खरेदी केल्यावर २ हजार रुपयांचे कॅशबॅक मिळेल. ही ऑफर एअरटेलच्या प्रिपेड ग्राहकांसाठी आहे. हे दोन्हीही स्मार्टफोन एअरटेलच्या १६९ रुपयांच्या रिचार्ज पॅकसहीत मिळेल. यात युजर्संना रोज 1GB 4G डेटा मिळेल. त्याचबरोबर अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधाही मिळेल.
या ऑफरचा फायदा घेण्यासाठी एअरटेल ग्राहकांना नोकीया २ किंवा नोकीया ३ यापैकी कोणताही एक स्मार्टफोन खरेदी करावा लागेल. सुरूवातीला ग्राहकांना मार्केट प्राईजनुसारच स्मार्टफोन मिळेल. यानंतर २ हजारांचे कॅशबॅक ग्राहकांना एअरटेल वॉलेटमध्ये ३६ महीन्यांत मिळेल. ग्राहकांना १८ महिने ३५०० रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. तेव्हा त्यांना ५०० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. अशाप्रकारे १८ महिन्यांपर्यंत ३५०० रुपयांचे रिचार्ज केल्यावर ग्राहकांना १५०० रुपयांचे सेकंड इंस्टॉलमेंट घेण्यासाठी पात्र करण्यात येईल.