मुंबई: गेल्या काही काळात टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेमुळे ग्राहकांची चांगलीच चंगळ झाली आहे. या स्पर्धेची सुरूवात खरे तर Reliance Jioने केली. कमी किमतीत अधिक डेटा असे Reliance Jio धोरण होते. त्यामुळे Jioने अल्पकाळातच बाजारात चांगलीच मुसांडी मारली. पण, आता इतर कंपन्यांनीही Reliance Jioचा वारू रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. Airtel ही Reliance Jio समोर सर्वात मोठे आव्हान करणारी सध्याची आघाडीची कंपनी ठरली आहे. Airtelने आपला ९९ रूपयांवाला प्लान नुकताच अपग्रेड केला. अपग्रेड प्लाननुसार ग्राहकाला २८ दिवसांच्या वैधतेसोबत थेट 2 GB डेटा मिळणार आहे. या प्लानवर ग्राहकांना यापूर्वी (अपग्रेड करण्याआगोदर) 1 GB हाय स्पीड डेटा मिळत होता.
दरम्यान, Airtelच्या अपग्रेड केलेल्या ९९ रूपयांवाल्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री रोमिंग सारख्या सुविधाही मिळणार आहेत. तसेच, ९९ रूपयांचा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना प्रतिदिन १०० एसएमएसही मिळतात. दरम्यान, सध्या हा प्लान केवळ निवडक ग्राहकांसाठीच आहे. काही काळात हा प्लान सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल.
दरम्यान, Reliance Jioकडेही ९९ रूपयांवाला प्लान आहे. या प्लानमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसोबत २ जीबी डेटा मिळतो. पण, मेसेजच्या बाबतीत मात्र हा प्लान एअरटेलपेक्षा काहिसा पाठिमागे आहे. Reliance Jioच्या या प्लानमध्ये ग्राहकाला प्रतिमिहना केवळ ३०० मेसेज मिळतात. महत्त्वाचे असे की, Reliance Jioने नुकतेच आपले सर्व प्लान अपग्रेड केले आहेत. आता ग्राहकांना Reliance Jioच्या प्रत्येक पॅकसोबत मिळणाऱ्या डेटासोबत 1.5GB डेटा प्रतिदिन एक्स्ट्रा दिला जात आहे.