ग्राहकांची स्मार्ट खरेदी, ऑनलाईन स्मार्टफोन विक्री ३८ टक्क्यांवर

सध्या ई-कॉमर्स शॉपिंगला अच्छे दिन आलेत. हा व्यापार वाढत असल्याने काही कंपन्यांची चलती झालेली पाहायला मिळत आहे.  

Updated: Jun 15, 2018, 09:57 PM IST
ग्राहकांची स्मार्ट खरेदी, ऑनलाईन स्मार्टफोन विक्री ३८ टक्क्यांवर title=

मुंबई : सध्या ई-कॉमर्स शॉपिंगला अच्छे दिन आलेत. हा व्यापार वाढत असल्याने काही कंपन्यांची चलती झालेली पाहायला मिळत आहे. ऑनलाईन स्मार्टफोन विक्री ३८ टक्क्यांवर वाढ झालेली पाहायला मिळत आहे. ई-मार्केटमध्ये स्मार्टफोन विक्रीचा हिस्सा देशातील एकूण विक्रीपैकी ३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. या विक्रीमध्ये फ्लिपकार्ट प्रथम स्थानावर असून कंपनीचा हिस्सा ५४ टक्के आहे. यानंतर अॅमेझॉन३० आणि एमआय डॉट कॉमचा वाटा १४ टक्के असल्याचे काऊन्टरपॉईन्ट रिसर्चने अहवालात म्हटले आहे. दरम्यान, ही वाढ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नवीन स्मार्टफोन आकर्षक ऑफरसह पहिल्यांदा उतरविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

जानेवारी-मार्च कालावधीत ऑनलाईन विक्रीमध्ये सर्वाधिक हिस्सा शाओमी कंपनीचा आहे. गेल्या तिमाहीत ऑनलाईन विक्रीमध्ये ५७ टक्के वाटा आपल्याकडे घेत पहिले स्थान पटकाविले. यानंतर सॅमसंग १४ टक्के आणि हयुवाई  ८ टक्क्यांवर आहे. तर मार्च तिमाहीत ऑफलाईन विक्रीच्या तुलनेत ई व्यापार क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे. देशातील ऑफलाईन क्षेत्रातील विक्री वर्षाच्या आधारे ३ टक्क्यांनी घसरली असून ऑनलाईन विक्री ४ टक्क्यांनी वाढल्याचे काऊन्टरपॉईन्टचे रिसर्चने स्पष्ट केलेय.

यापूर्वी स्मार्टफोन कंपन्यांकडून एकाच वितरकाकडून विक्री करण्यास भर देण्यात येत होता. मात्र आता त्यांनी आपल्या धोरणात बदल करत अनेक ई-पोर्टलवरुन विक्री करण्याचे धोरण अबलंबिले आहे. यामुळे स्पर्धा वाढण्यास मदत झाली. मार्च तिमाहीमध्ये साधारण ३० स्मार्टफोन मॉडेल भारतीय बाजारात उतरविण्यात आली होती. ऑनलाईन विक्रीमधील पहिल्या पाच मॉडेलमध्ये चार शाओमी, तर एक ह्युवाई कंपनीचे आहे.