close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अमेझॉनवर मिळतेय 'भैंस की आंख', नेटिझन्स चक्रावले

अमेझॉनवर 'ड्रंकेन वुमेन्स स्लिप ऑन कारपेट स्लिपर्स' किंवा 'ड्रंकेन वुमेन्स स्ट्रिप्ड बोनॉट विंटर कारपेट स्लिपर्स' अशा नावाचीही उत्पादनं तुम्हाला पाहायला मिळतील

Updated: Jun 7, 2019, 09:03 AM IST
अमेझॉनवर मिळतेय 'भैंस की आंख', नेटिझन्स चक्रावले

मुंबई : अमेझॉनवर 'भैंस की आंख' पाहून खरं तर नेटिझन्सला आश्चर्याचा धक्काच बसला होता... हे एका भारतीय कंपनीचं 'ब्रॅन्डनेम' आहे. ही 'भैंस की आंख' एका पादत्राणं निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीनं आपल्या उत्पादनाची विक्री अमेझॉनद्वारे ऑनलाईन पद्धतीनं सुरू केलीय. 'अमेझॉन'वर 'भैंस' असं सर्च केलंत तर तुम्हाला या कंपनीचे चप्पलशिवाय आणखीही काही उत्पादनंही दिसतील. 

या कंपनीच्या चप्पलांच्या किंमतीही वाजवी आहेत... त्याची नेटीझन्सनं प्रशंसाही केलीय. 'दीर्घकाळ कामाच्या थकव्यानंतर आमच्या चप्पल परिधान केल्यानं तुम्हाला आराम मिळेल. तुम्हाला नरम, गरम, मुलायम आणि आरामदायक चप्पल खरेदी करायची असतील तर हे तुमच्यासाठीच आहे', असं कंपनीनं आपल्या उत्पादनाविषयी म्हटलंय. 

पण, खरं तर कंपनीच्या उत्पादनापेक्षा कंपनीचं जरा हटके असलेलं नावच ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्यात जास्त यशस्वी ठरतंय. 

अमेझॉनवर 'ड्रंकेन वुमेन्स स्लिप ऑन कारपेट स्लिपर्स' किंवा 'ड्रंकेन वुमेन्स स्ट्रिप्ड बोनॉट विंटर कारपेट स्लिपर्स' अशा नावाचीही उत्पादनं तुम्हाला पाहायला मिळतील. या उत्पादनांची निर्मिती 'ड्रंकेन' नावाची कंपनी करते.