नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर चार दिवसांचा 'Apple day sale' सेल सुरू आहे. हा सेल २७ फेब्रुवारीपासून २ मार्चपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन एक्स, आयफोन ८, आयफोन ८ प्लस, आयपॅड, मॅकबूक आणि अॅपल वॉचवर मोठा डिस्काऊंट दिला जात आहे.
या सेलमध्ये एसबीआय कार्ड यूजर्सना जास्त फायदा मिळणार आहे. कारण सेलमध्ये खरेदीसाठी जर तुम्ही एसबीआयचं डेबिट कार्ड वापरलं तर ५ टक्के अतिरीक्त डिस्काऊंट दिला जाणार आहे. इतकेच नाहीतर एसबीआय यूजर्सना EMI पर्यायही आहे.
- आयफोन एक्स - सेलमध्ये आयफोन एक्सच्या ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत ८२ हजार ९९९ रूपये तर २५६ जीबी व्हेरिएंट ९७ हजार ९९९ रूपयांमध्ये दिला जातोय.
- आयफोन ८ - आयफोन ८ चा ६४ जीबीचा सिल्वर ग्रे आणि गोल्ड फोन ५४ हजार रूपयात, आयफोन ८ २५६ जीबीचा फोन ६९ हजार ९९९ रूपयात, आयफोन ८ प्लसचा ६४ जीबीचा सिल्वर ग्रे आणि गोल्ड फोन ६४ हजार ९९९ रूपयात, आयफोन ८ प्लसचा ६४ जीबीचा सिल्वर फोन ६५ हजार ९९९ रूपयात, तर आयफोन ८ प्लस २५६ जीबीचा फोन ७९ हजार ९९९ रूपयात मिळेल.
- आयफोन ७ ३२ जीबी फोनचा ब्लॅक आणि रोज गोल्ड व्हेरिएंट ४१ हजार ९९९ रूपयात मिळतो आहे. आयफोन ७ ३२ जीबीचं गोल्ड आणि सिल्वर व्हेरिएंट ४२ हजार ९९९ आणि ४३ हजार ९९९ रूपयात मिळत आहे. आयफोन ७ चं १२८ जीबी व्हेरिएंट ५५ हजार ९९९ रूपयात मिळत आहे.
- आयफोन ७ प्लसचं ३२ जीबी व्हेरिएंट ५६ हजार ९९९ रूपयात, आयफोन ७ प्लस ३२ जीबी गोल्ड व्हेरिएंट ५७ हजार ८८५ रूपयात मिळतो आहे. आयफोन ७ प्लस १२८ जीबी जेट ब्लॅक व्हेरिएंट ७९ हजार रूपयात खरेदी केलं जाऊ शकतं.
- आयफोन ६ चं ३२ जीबी स्पेस ग्रे मॉडल २४ हजार ९९९ रूपयात, आयफोन ६ चं ३२ जीबी गोल्ड मॉडल २५ हजार ९९९ रूपयात. आयफोन ६ एस ३२ जीबीचं स्पेस ग्रे मॉडल ३२ हजर ९९९ रूपयात आणि आयफोन ६ एस ३२जीबीचं गोल्ड मॉडल ३३ हजार ९९९ रूपयात मिळतो आहे.
- आयफोन - एसई चं ३२ जीबी स्पेस ग्रे, रोज गोल्ड व्हेरिएंट १८ हजार ९९९ रूपयात आणि आयफोन एसई ३२ जीबीचं सिल्वर व्हेरिएंट २० हजार ९९९ रूपयात खरेदी करू शकता.
- फ्लिपकार्टवर अॅपल वॉच सीरिज ८५०० रूपयात खरेदी केली जाऊ शकते. आणि आयपॅडला २२ हजार ९०० रूपयात खरेदी करू शकता.