Ather 450S Electric Scooter: भारतात इलेक्ट्रिक दुचाकींच्या (Electric Scooters) मार्केटमध्ये Ola आणि Ather चा दबदबा असून त्यांनी ग्राहकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दोन्ही कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहक पहिली पसंती देत असून, त्यांच्या विक्रीच्या आकडेवारीतूनही हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान Ather ने आता आपल्या स्पर्धक Ola कंपनीला आव्हान देण्यासाठी बाजारात आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर आणण्याची तयारी केली आहे. दमदार रेंज असणारी ही स्कूटर आधीच्या तुलनेत आणखी स्वस्त असेल असं बोललं जात आहे.
Ather Energy ने भारतीय बाजारपेठेत आपली आणखी एक दमदार आणि स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची तयारी केली आहे. Ather च्या या नव्या स्कूटरचं नाव Ather 450S असं शकतं. याचं कारण म्हणजे कंपनीने नुकतंच 450S नावाने ट्रेडमार्क केला आहे. हा ट्रेडमार्क आगामी काळात लाँच होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी वापरला जाऊ शकतो असं बोललं जात आहे.
Ather ने मार्च 450S ट्रेडमार्क मिळवण्यासाठी अर्ज केला असून, त्याची औपचारिकता पूर्ण झाली आहे. याशिवाय कंपनीने 450S लोगोसाठीही ट्रेडमार्कचा अर्ज केल आहे. यावरुन Ather Energy लवकरच बाजारात आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर आणणार असल्याचं स्पष्ट होत आहे. कंपनीने याबाबत अधिकृत माहिती काही दिलेली नाही.
या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल अधिकृतपणे कंपनीने माहिती जाहीर केलेली नाही. पण काही रिपोर्टनुसार, स्वस्त गाड्यांच्या रेंजमध्ये ही लाँच केली जाऊ शकते. या स्कूटरमध्ये अत्याधुनिक फिचर्स आणि दमदर ड्रायव्हिंर रेंज असेल. तसंच यामध्ये 7 इंचाचा टीएफटी टचस्क्रीन इंफोटेंमेट सिस्टम, ऑटो होल्ड आणि ड्रायव्हिंग मोड असे फिचर्स असण्याची शक्यता आहे.
तसं पाहायला गेल्यास Ather Energy सध्या आपली प्रतिस्पर्धी कंपनी Ola च्या मार्गावर असल्याचं दिसत आहे. ज्याप्रमाणे Ola ने S1 रेंजमध्ये बेस मॉडेल म्हणून S1 Air ला सहभागी करुन घेतलं आहे, त्याप्रमाणे Ather Energy 450S ला लाँच करणार आहे. कंपनीने अद्याप याच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. पण सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या Ather 450X च्या तुलनेत ही स्वस्त असेल असा अंदाज आहे. सध्या 450X ची किंमत 98 हजार 183 पासून सुरु होत आहे. तर Ola S1 Air ची किंम 84 हजार 999 पासून सुरु होते.