पुन्हा येतेयं 'बजाज चेतक स्कूटर', किंमत आणि फिचर्स ऐकून व्हाल हैराण

 पुनरागम करण्यासाठी बजाज तयारी करतंय. 

Updated: Jul 23, 2018, 03:16 PM IST
पुन्हा येतेयं 'बजाज चेतक स्कूटर', किंमत आणि फिचर्स ऐकून व्हाल हैराण title=

मुंबई : देशातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वांच्या नंबर वन पसंतीची स्कूटर पुन्हा येतेयं. हो..'हमारा बजाज' पुन्हा येतेय. २००६ पर्यंत बजाजने सर्वांच्या मनावर राज्य केलं. पुनरागम करण्यासाठी बजाज तयारी करतंय. बजाज चेतक स्कूटरला पुन्हा मार्केटमध्ये आणत असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आहे. सर्वांना परवडणारी स्कूटर बंद झाल्यानंतर अनेक वर्षे याची चर्चा झाली होती. आता चेतकच्या चाहत्यांसाठी यापेक्षा मोठी आनंदाची बातमी कोणती असणार ?

चेतक अपडेट

बजाज चेतक पुढच्यावर्षी लॉन्च केलं जाऊ शकतं. १९७२ ते २००६ पर्यंत बजाज चेतकचे उत्पादन केलं जात होतं. गियरलेस स्कूटर बाजारात आल्यानंतर बजाज चेतक अपडेट करण्यात आली नव्हती. याचा परिणाम विक्रीवर झाला आणि २००९ मध्ये कंपनीला गाशा गुंडाळावा लागला. बादशाह कंपनी बजाज ऑटो स्कूटरचे सेग्मेंट करतेय. स्कूटर सेगमेंटमध्ये कधी काळी कंपनीचे ५० टक्केहून अधिक शेअर्स होते.  पण सध्या बजाजच्या स्कूटर सेगमेंटमध्ये केवळ १५ टक्के मार्केट शेअर वाचले आहेत.

किंमत आणि फिचर्स 

होंडा एक्टिवा, पियाजियो, वेस्पा आणि अप्रीलिया SR150 यांच्याशी बजाजच्या स्कूटरची स्पर्धा आहे. नव्या बजाज चेतकची किंमत ७० हजार रुपये असू शकते. याचे इलेक्ट्रिक वर्जनदेखील भारतीय बाजारात लॉन्च केले जाऊ शकते. बजाजच्या नव्या मॉडेलमध्ये १२५ सीसी, एअर कूल्ड इंजिन दिलं गेलंय.  ही इंजिन ९-१० bhp आणि ९ Nm टॉर्क जनरेट करू शकते. सस्पेंशनसाठी सिंगल आर्म फ्रंट संस्पेशन आण रियर मोनोशॉक दिले जाणार आहे.