एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरत असाल तर..! लवकरच ही कारवाई

 दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) एका पेक्षा जास्त सिमकार्ड असलेल्या ग्राहकांना कारवाईचा इशारा दिला आहे.

Updated: Dec 9, 2021, 07:34 AM IST
एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरत असाल तर..! लवकरच ही कारवाई

मुंबई : दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) 9 पेक्षा जास्त सिमकार्ड असलेल्या ग्राहकांच्या सिमची पुन्हा पडताळणी करण्याचे आणि पडताळणी न झाल्यास सिम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. जम्मू-काश्मीर आणि आसामसह ईशान्येकडील राज्यांत मोठ्या प्रमाणात सिम वापरली जात आहे. ही संख्या 6 सिमकार्डची आहे.

पुन्हा पडताळणी करावी लागणार

दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) जारी केलेल्या आदेशानुसार, ग्राहकांकडे परवानगीपेक्षा जास्त सिमकार्ड असल्यास, त्यांना त्यांच्या आवडीचे सिम सुरू ठेवण्याचा आणि बाकीची बंद करण्याचा पर्याय दिला जाणार आहे. दूरसंचार विभागाने केलेल्या विश्लेषणादरम्यान, जर एखाद्या ग्राहकाकडे सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या विहित संख्येपेक्षा जास्त सिम कार्ड असल्याचे आढळले, तर सर्व सिमची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे.

म्हणून पाऊल उचलले

आर्थिक गुन्हे, आक्षेपार्ह कॉल्स, ऑटोमेटेड कॉल्स आणि फसवणुकीच्या घटनांचा तपास करण्यासाठी दूरसंचार विभागाने हे पाऊल उचलले आहे. अशा घटनांपासूनचे धोके टळण्यास मदत होणार आहे.

दूरसंचार कंपन्यांनी कारवाई करावी

दूरसंचार कंपन्यांनी वापरात नसलेल्या सिमबाबत कारवाई करावी, असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे. विभागाने टेलिकॉम कंपन्यांना नियमानुसार वापरात नसलेले सर्व मोबाइल नंबर डेटाबेसमधून काढून टाकण्यास सांगितले आहे.