मुंबई : सध्या जगभरात १२० कोटी जण व्हॉट्सअॅप हे अॅप वापरतात. जगात हे सर्वात लोकप्रिय अॅप आहे. अशामध्ये नेहमी गंडा घालणारे मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल होतात.
सध्या व्हॉट्सअॅप पुन्हा चर्चेत आहे ती एका चिटींग घोटाळ्यामुळे... या नव्या घोटाळ्यात एक मेसेज तुमच्या बँकेची माहिती चोरू शकतो.
हा घोटाळा हा ब्रिटनमध्ये सुरू झाला आहे. त्यामुळे आता काही दिवसात जगभरातील विविध देशातील पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या संदर्भात ब्रिटनमधील फ्रॉड अँड सायबर क्राइम सेंटर अॅक्शन फ्रॉड यांनी जगातील व्ह़ॉट्सअॅप युजर्सला खबरदारी म्हणून या घोटाळ्याच्या मेसेजचा स्क्रिन शॉट आपल्या ट्विटरवर ट्वीट केला आहे.
या मेसेज व्हॉट्सअॅप टीमच्या नावाने व्हायरल करण्यात येत आहे.
आमच्या रेकॉर्डनुसार तुमचे व्हॉट्सअॅपची ट्रायल सर्व्हिस एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. त्यामुळे हा ट्रायल पिरिअड संपल्यामुळे तुम्ही आता कोणताही व्हॉट्सअॅप मेसेज पाठवू किंवा स्वीकारू शकत नाही.
तुमचे व्हॉट्सअॅप विना अडथळा सुरू राहण्यास तुम्ही आमच्या सबस्क्रिबशन पिरिअडपैकी एखादा सबस्क्रिपशन निवडा. या मेसेज सह युजर्सला फोन नंबर आणि पेमेंटची माहिती अपडेट करण्यासाठी सांगितली जाते.
युजर्सला असा मेसेज आला तर त्यांनी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तसेच आपल्या बँकची माहिती कोणत्याही वेबसाइटवर शेअर करू नका.
व्हॉट्सअॅपन जानेवारी २०१६ पासून आपले अॅप डाऊनलोडसाठी मोफत केले आहे. त्यामुळे त्याला कोणताही चार्ज लागत नाही.
Here is why we think this clever WhatsApp email will catch people out: https://t.co/5O1kf7bY1N #FraudFriday pic.twitter.com/s94Sxjtv0i
— Action Fraud (@actionfrauduk) July 14, 2017