चार्ज न करता Bluetooth Headphones मिळवा 80 तासांची बॅटरी लाइफ

 भारतीय बाजारात स्मार्टफोन प्रमाणेच इयरफोन, हेडफोन आणि इयरबड्सचे मार्केट वेगाने वाढले आहे. स्मार्टफोन कंपन्या स्वतःचे इयरफोन्स बाजारात आणत आहेतच, मात्र 

Updated: Aug 19, 2022, 01:38 PM IST
चार्ज न करता Bluetooth Headphones मिळवा 80 तासांची बॅटरी लाइफ title=

Bluetooth Headphones : भारतीय बाजारात स्मार्टफोन प्रमाणेच इयरफोन, हेडफोन आणि इयरबड्सचे मार्केट वेगाने वाढले आहे. स्मार्टफोन कंपन्या स्वतःचे इयरफोन्स बाजारात आणत आहेतच, मात्र त्या व्यतिरिक्त देखील इतर कंपन्या देखील आता सेगमेंटमध्ये उतरल्या आहे.  काहीवेळेस ब्लूटूथ हेडफोनला आपण चार्ज करायचे विसरून जातो आणि बंद होऊन जातात. अशावेळी ब्लूटूथ हेडफोनसोबत असून देखील वापरू शकते. मात्र आता तुमच्यासाठी अप्रतिम वायरलेस हेडफोन बाजारात आले आहेत. ज्यांना चार्जिंगची अजिबात गरज भासणार नाही. असे हेडफोन Adidas ने लॉन्च केले आहेत आणि त्यांचे नाव Adidas RPT-02 SOL Solar Powered Wireless Headphones आहे. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया..   

हे वायरलेस हेडफोन चार्जिंगशिवाय 80 तास टिकतील!

Adidas ने बाजारात नवीन वायरलेस ब्लूटूथ हेडफोन्स, Adidas RPT-02 SOL Solar Powered Wireless Headphones लाँच केले आहेत. त्यांच्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना वायरने चार्ज करावे लागत नाही कारण ते सौर चार्जिंगवर काम करतात. कंपनीचा दावा आहे की सोलर चार्जिंगच्या मदतीने तुम्ही 80 तासांपर्यंत बॅटरी लाइफ मिळवू शकता. 

Adidas Solar Powered वायरलेस हेडफोन्सची किंमत

Adidas RPT-02 SOL सौर उर्जेवर चालणारे वायरलेस हेडफोन कंपनीच्या वेबसाइटवर $229 (अंदाजे रु. 18 हजार) रूपयांना उपलब्ध होतील.  हे हेडफोन नाईट ग्रे आणि सोलर यलो या दोन रंगांमध्ये उपलब्ध करून दिले जात आहेत आणि 23 ऑगस्ट 2022 पासून बाजारात उपलब्ध होतील.

या हेडफोन्सची वैशिष्ट्ये

हे वायरलेस ब्लूटूथ हेडफोन 45mm डायनॅमिक ड्रायव्हर्स, 20-20,000Hz वारंवारता प्रतिसाद, 105dB चे संवेदनशीलता रेटिंग आणि 32Ohms च्या प्रतिबाधासह लॉन्च केले आहेत. यामध्ये, तुम्हाला एक माइक आणि सोबत पाच-मार्गी कंट्रोल नॉब देखील दिला जात आहे, ज्याचा वापर हेडफोन चालू आणि बंद करण्यासाठी, गाणी प्ले करण्यासाठी, पॉज, रीप्ले आणि डिव्हाइस जोडण्यासाठी केला जाऊ शकतो. यामध्ये वरच्या बाजूला एक सोलर पॅनल देण्यात आला आहे जो नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्ही प्रकाशाने चार्ज होऊ शकतो.