BSNL चा 39 रुपयांचा नवा प्लॅन ; मिळतील या सुविधा

टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ने युजर्ससाठी एक नवीन आणि स्वस्त प्लॅन सादर केला आहे. 

Updated: May 10, 2018, 01:29 PM IST
BSNL चा 39 रुपयांचा नवा प्लॅन ; मिळतील या सुविधा title=

मुंबई : टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ने युजर्ससाठी एक नवीन आणि स्वस्त प्लॅन सादर केला आहे. नव्या प्लॅनमध्ये युजर्सला कंपनीकडून अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, १०० एसएमएस आणि त्याचबरोबर फ्री PRBT १० दिवसांसाठी देण्यात येत आहे. बीएसएनएलची ही ऑफर होम सर्किल आणि नॅशनल रोमिंग दोघांसाठी उपलब्ध आहे. मात्र अजूनही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिल्ली आणि मुंबईत सुरु झालेली नाही.

९९ आणि ३१९ रुपयांचा प्लॅन

३९ रुपयांच्या प्लॅनशिवाय बीएसएनएलने अलिकडेच ९९ आणि ३१९ रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये संपूर्ण देशातील कोणत्याही नेटवर्कवर २६ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत आहे. तर ३१९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ९० दिवसांसाठी फ्रीमध्ये मिळत आहे. मात्र यात एसएमएसची सुविधा मिळणार नाही. 

जियोमध्ये ४९ रुपयांत मिळेल सर्व काही

रिलायन्स जिओने युजर्ससाठी फ्री व्हाईस कॉलिंगची सुविधा सुरु केली आहे. यात  1 GB 4G डेटाची सुविधा ४९ रुपयांत मिळत आहे. ४९ रुपयांत युजर्स १ महिन्यासाठी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. ही ऑफर फक्त जिओ फोन युजर्ससाठी व्हॅलिड आहे. बीएसएनएलचा ३९ रुपयांचा प्लॅन सर्व प्रीपेड युजर्ससाठी उपलब्ध आहे. 

रिलायन्स जिओकडून लवकरच जिओ फायबर लॉन्च करण्याची तयारी केली जात आहे. बीएसएनएलच्या फायबर ब्रॉडब्रॅंड सेवेतून जिओला टक्कर देण्याची तयारी केली जात आहे.