तुमची डिझेल कार आहे का? 2027 पर्यंत डिझेल कारवर बंदी येणार?

Diesel Cars Ban: तरुण कपूर (Tarun Kapoor) यांच्या नेतृत्वातील समितीने डिझेलवर धावणाऱ्या बसेस (Diesel Operated Buses) 2024 पासून ताफ्यात आणण्यास बंद केलं पाहिजे असं सुचवलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 8, 2023, 07:31 PM IST
तुमची डिझेल कार आहे का? 2027 पर्यंत डिझेल कारवर बंदी येणार? title=

Diesel Cars Ban in India: भारतात 2027 पासून डिझेलवर धावणारी चारचाकी वाहनं बंद होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे तेल मंत्रालयाच्या समितीने भारतात 2027 पर्यंत डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या वापरावर बंदी घालावी असं सुचवलं आहे. स्वच्छ ऊर्जेवर (Clean Energy) लक्ष केंद्रीत करण्याच्या दृष्टीने तेल मंत्रालयाच्या ऊर्जा संक्रमण सल्लागार समितीने (Energy Transition Advisory Committee) हा सल्ला दिला आहे. डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घालत करोडो लोकांची वस्ती असणाऱ्या आणि प्रदूषणाने घेरलेल्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक आणि गॅस-इंधन असलेल्या वाहनांचा वापर वाढवला पाहिजे असा सल्ला समितीने दिला आहे. 

तरुण कपूर यांच्या नेतृत्वातील समितीने 2024 पासून ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या बसेसचा समावेश करणं बंद केलं पाहिजे असंही सांगितलं आहे. "2030 पर्यंत इलेक्ट्रिक नसणाऱ्या आणि 2024 पासून डिझेलवर धावणाऱ्या बसेस शहरातील वाहतुकीत समाविष्ट केल्या जाऊ नयेत," असं समितीने सांगितलं असल्याची माहिती रॉयटर्सने तेल मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध रिपोर्टच्या आधारे दिली आहे.

देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी सरकारने फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक अँड हायब्रीड व्हेईकल स्कीम (FAME) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनांमध्ये अधिक वाढ करावी असा सल्लाही समितीने दिला आहे. 

समितीने यावेळी 2024 पासून शहरातील इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी करण्यास परवानही द्यावी असंही सुचवलं आहे. तसंच कार्गोच्या वाहतुकीसाठी रेल्वे आणि गॅसवर धावणाऱ्या ट्रकच्या वापरात वाढ करावी असं सांगितलं आहे. रेल्वे नेटवर्क पुढील दोन ते तीन वर्षात पूर्पपणे इलेक्ट्रिक असेल असं बोललं जात आहे. 

याशिवाय लांब पल्ल्याच्या बसेस दीर्घ कालावधीसाठी वीजेवर चालवल्या पाहिजेत. तसंच पुढील 10-15 वर्षांसाठी संक्रमण इंधनाच्या रूपात गॅसचा वापर केला जाऊ शकतो असं सांगितलं आहे. भारताने भूमिगत वायूचा साठा निर्माण करण्याबाबत विचार करावा, असेही पॅनेलने सुचवले आहे.