iPhone 16 or 15 which one is Best? : भारतात आयफोन 16 आज 20 ससप्टेंबराला लॉन्च झाला आहे. पण 13 सप्टेंबरपासून या फोनसाठी प्री ऑर्डर करता येत होती. यावेळी नवीन सिरिजच्या किंमतीत वाढ करण्याऐवजी अॅपलने आयफोन 16 प्रो सिरिजची किंमत कमी केली आहे. त्यामुळे आयफोन 16 सिरिजची सुरूवात भारतात 1,19,900 रुपयांपासून होते. याच फोनची किंमत यूएस सारख्या देशांमध्ये अजून स्वस्त आहे. त्या देशांमध्ये या फोनची किंमत 83,891 रूपयांच्या आसपास आहे. याशिवाय आयफोन 16 मध्ये काही नवीन फीटर्स देण्यात आले आहेत. या नवीन सिरिजमध्ये कॅमेऱ्याचे अॅडव्हान्स फिचर्स आले आहेत. प्रोसेसर आणि बॅटरी लाइफमध्येही बदल करण्यात आले आहेत. आधीच्या फोनपेक्षा या फोनची रॅम 2GB ने जास्त म्हणजे 8GB आहे. महत्त्वाचे म्हणजे आयफोन 16 मध्ये एक्स्ट्रा 12 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. असे असताना आयफोन 16 आणि 15 यांमध्ये कोणता फोन जास्त चांगला आणि परवडणारा आहे चला बघूया...
आयफोन 16 मध्ये आयफोन 15च्या तुलनेत लेटेस्ट बदल करण्यात आले आहेत त्यामुळे आयफोन 16 हे अॅपलचे सध्याचे बेस्ट डिव्हाइस आहे. नवीन कॅमेरा हे या फोनचे आकर्षण बनले असल्याने लोकही हा फोन वापरण्यासाठी उत्सुक आहेत. साधारणपणे अॅपल आपल्या पोडक्टची किंमत दरवेळी वाढवत असतो. पण आयफोन 16 यासाठी अपवाद आहे. हो! तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आयफोन 15 आणि आयफोन 16 यात फारसा फरक नाही. भारतात आयफोन 15 ची किंमत 1,09,000 रूपये आहे तर आयफोन 16 ची किंमत 1,20,000 रूपये असल्याचे बघायला मिळते आहे. म्हणजे अॅपल च्या नवीन फोनची किंमत आधीच्या फोनपेक्षा फक्त 11000 हजारांनी जास्त आहे. असे असताना किंमत आणि नवीन फिचर्सचा विचार करता आयफोन 16 घेणे जास्त फायदेशीर आहे.
इतर स्मार्टफोन्सपेक्षा आयफोनची किंमत ही कित्येक पटीने जास्त आहे हे आपल्याला सगळ्यांच माहिती आहे. पण आयफोन वापरत असताना छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला अॅंड्रॉइडपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. जसे की कोणत्याही ग्रोसरी अॅपवरून तुम्ही काही सामान ऑर्डर करत असाल तेव्हा अॅंड्रॉइडपेक्षा आयफोनवरून जवळपास 50 रूपये जास्त द्यावे लागतात. युट्युबचे एका महिन्यासाठी प्रीमियम सबस्क्रीप्शन घेताना 149 रूपयांऐवजी आयफोन यूजर्सला 195 रूपये मोजावे लागतात. तसेच गुगल क्लाऊडचे एक्स्ट्रा स्टोरेज घेतानाही 100GB साठी अॅंड्रॉइड फोनमध्ये 130 रूपये महिना तर आयफोनसाठी 179 रूपये महिना द्यावा लागतो.