मुंबई : बॉलिवूड सिनेमांमधून 'ब्रेक अप पार्टी'ची थीम आता काही लोकांसाठी नवीन राहिलेली नाही... परंतु, सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच ट्रेन्ड पाहायला मिळतोय... डिव्होर्स सेल्फीचा...
होय, पती-पत्नी किंवा पार्टनर्स एकमेकांपासून वेगळं होण्याचा आनंद सेल्फीच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसतायत.
यावर, घटस्फोट ही काही सेलिब्रेट करायची गोष्ट आहे का? असाही प्रश्न अनेकांना पडलाय. पण, डिव्होर्स सेल्फी सोशल मीडियावरून शेअर करणारे दु:खी नाही तर आनंदी दिसत आहेत.
हा ट्रेन्ड सध्या अमेरिका आणि युरोपीय देशांच्या सोशल मीडिया युझर्सकडून प्रचलित झालेला दिसतोय.