Diwali 2022: Ola चा दिवाळी धमाका! मार्केटमध्ये येणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर

ओला आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीत मोठा धमाका करणार आहे.  

Updated: Oct 10, 2022, 04:40 PM IST
Diwali 2022: Ola चा दिवाळी धमाका! मार्केटमध्ये येणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर  title=
diwali 2022 ola cheapest electric scooter nmp

Ola Electric Scooter: अवघ्या दोन आठवड्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे. अशात घरोघरी साफसफाई, दिवाळी फराळ आणि खरेदीचे प्लन ठरतं आहेत. दिवाळी म्हटलं की, नवीन वस्तू घेण्याची सर्वात चांगली संधी असते. त्यामुळे मोठ्या मोठ्या कंपन्यांना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी  Diwali Offer ची घोषणा करतात. अशात ओला आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीत मोठा धमाका करणार आहे.  

देशात इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. त्याच वेगाने ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) देखील आपली पकड मजबूत करत आहे. कंपनीने नुकतीच आपली परवडणारी स्कूटर Ola S1 आणली, ज्याला कंपनीच्या प्रीमियम स्कूटर OLA S1 Pro ची छोटी आवृत्ती म्हणता येईल. आता दिवाळीला कंपनी आणखी एक धमाका करणार आहे. कंपनीच्या सीईओने जाहीर केले आहे की, 22 ऑक्टोबरला ओला एक मोठी घोषणा करणार आहे. हे कंपनीचे पूर्णपणे नवीन उत्पादन असेल. अशा परिस्थितीत ओला परवडणारी स्कूटर लॉन्च करू शकते, ज्याची किंमत 80 हजार रुपये असू शकते असं मानलं जात आहे. (diwali 2022 ola cheapest electric scooter nmp)

ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले, "आमचा दिवाळी कार्यक्रम 22 ऑक्टोबर रोजी होईल. ओलाच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या घोषणांपैकी एक. लवकरच भेटू!" मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीची नवीन स्कूटर Ola S1 प्रमाणेच फीचर्स देण्याचा प्रयत्न करेल, जरी त्याचा बॅटरी पॅक लहान दिला जाईल.

Ola S1 वैशिष्ट्ये आणि किंमत

कंपनीने आपली OLA S1 इलेक्ट्रिक स्कूटर या वर्षी 15 ऑगस्ट रोजी लॉन्च केली होती. त्याची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे. Ola S1 मध्ये 2.98kWh बॅटरी पॅक उपलब्ध आहे. त्याचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. कंपनीच्या मते, Ola S1 पूर्ण सिंगल चार्जवर 141 किमीची रेंज देऊ शकते. Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro सारखी दिसते. त्याच वेळी, Ola S1 Pro ला 3.9kWh चा बॅटरी पॅक मिळतो आणि त्याची किंमत 1,39,999 रुपये आहे.