सॅन फ्रान्सिस्को : गेल्या काही महिन्यापूर्वी बाजारात आलेल्या आय इसेंशल फोनच्या किंमतीत २०० डॉलरची कपात करण्यात आली आहे. कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आमच्या उत्पादनांची आणि ब्राँडचा अनुभव आणखी अधिक आणि सोपा करण्यासाठी आमचा इसेंशल फोन हा इसेंशल डॉट कॉमवर ४९९ डॉलरला विक्रीसाठी उपलब्ध आहे.
यापूर्वी हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे धन्यवादही या ब्लॉगमध्ये केले आहे.
कंपनीने तर्फे म्हणण्यात आले की आम्ही अशा ग्राहकांना २०० डॉलर म्हणजे सुमारे १२ हजार रुपयांचा फ्रेंड अँड फॅमेली कोड देणार आहे. जे ग्राहक इसेंशल ३६० कॅमेरा किंवा इतर इसेंसल फोन खरेदी करणार आहेत त्यांना हा कोड मिळणार आहे.
- एज टू एज डिस्प्ले
- एक मॉड्यूलर प्रणाली ४६० डिग्री कॅमेरा जोडला जाऊ शकतो.
- ५.७ इं एलटीपीएस डिस्प्ले १९:१० चा अॅस्पेक्ट रेशियोसह
- यात दोन १३ मेगा पिक्सल सेंसर्ससह ड्युअल प्राईमरी कॅमेरा
- २.४५ गीगाहर्टचा ऑक्टाकोर क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३ चिपसेट एड्रेनो ५४० जीपीयूसोबत
- या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल मेमरी आहे. ही वाढवता येत नाही.