तुमचा चेहरा बघून अनलॉक होणार हा स्मार्टफोन

चीनची मोबाईल कंपनी शाओमीनं त्यांचा Mi MIX 2 हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला आहे.

Updated: Oct 11, 2017, 08:33 PM IST
तुमचा चेहरा बघून अनलॉक होणार हा स्मार्टफोन  title=

मुंबई : चीनची मोबाईल कंपनी शाओमीनं त्यांचा Mi MIX 2 हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला आहे. या फोनमध्ये शाओमीनं अनेक सुविधा दिल्या आहेत. Mi MIX 2 हा स्मार्टफोन बेजल लेस स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन ५.९९ इंचाचा असून १८:९ रेश्योचा डिस्प्ले आहे. या मोबाईलच्या फ्रंट कॅमेराच्या माध्यमातून फोन अनलॉक करता येणार आहे. फिंगरप्रिंटसारखंच चेहरा बघून हा स्मार्टफोन अनलॉक करता येणार आहे. या फोनला फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. १७ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजल्यापासून हा स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध असेल.

डिस्पले

Mi MIX 2 मध्ये 1080x 2160 पिक्सलचा ५.९९ इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. आयपीएस एलसीडी कॅपेसिटीव्ह टच स्क्रीन असलेल्या या डिस्प्लेमध्ये कोरनिंग गोरिल्ला ग्लासचा प्रयोग करण्यात आलाय.

रॅम, मेमरी आणि प्लॅटफॉर्म

शाओमीचा नवा फोन अ‍ॅन्ड्रॉईड ७.१ नोगटवर काम करतो. यात व्कॉलकॉम MSM8998 स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर देण्यात आलाय. फोनमध्ये कंपनीकडून कोणताही कॉर्ड स्लॉट दिला नाहीये. याचे ६जीबी आणि ८ जीबीचे दोन व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. हा फोन ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी इंटरनल मेमरीसोबत मिळेल. पण भारतीय बाजारात या फोनचं केवळ १२८ जीबी व्हेरिएंटच मिळणार आहे.

कॅमेरा

कॅमेराच्या क्वालिटीबाबत शाओमीचे फोन अधिक चांगले मानले जातात. Mi MIX 2 मध्ये १२ मेगापिक्सल बॅक कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा देण्यात आल्याची शक्यता आहे.

बॅटरी

शाओमीच्या या फोनमध्ये 3500mAh ची बॅटरी देण्यात आलीये. या फोनमध्ये USB Type-C चार्जिंग पॉईंटही देण्यात आलाय. कंपनीने भारतीय बाजारात या फोनचं सिरॅमिक बॉडी असलेलं व्हेरिएंट उतवरलं आहे. या स्मार्टफोनची किंमत ३५ हजार ९९९ रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.