मुंबई : न्यूझीलँडमध्ये झालेल्या हल्ल्याची फेसबूकवर लाइव्ह स्ट्रिमिंगच्या घटनेनंतर फेसबूकने आपल्या प्लॅटफॉर्मवर नियम अजून कठोर बनवले आहेत, जे विशेष करून LIVE कॅमेरा फीचरशी जोडलेले आहेत. सुधारीत धोरणांच्या अंतर्गत, जो व्यक्ती फेसबूकच्या सगळ्यात गंभीर धोरणांचं उल्लंघन करेल, त्याला एक निश्चित काळासाठी लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यापासून प्रतिबंधित (जसे पहिल्या वेळेस उल्लंघन केल्यावर ३० दिवसांसाठी) केले जाईल.
फेसबूकमध्ये ‘इंटीग्रिटी’चे उपाध्यक्ष गाय रोसेन यांनी सांगितले की, ज्या लोकांनी निश्चित नियम तोडले, त्यांच्यावर फेसबूकचे लाइव्ह स्ट्रिमिंग फीचरचा वापर करण्यावर बंदी आणली जाईल.
रोसेन यांनी सांगितलं की, न्यूझीलँडमध्ये झालेल्या भयावह दहशतवादी हल्ल्यानंतर, आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत की, आमच्या सेवांना मर्यादीत केलं जाईल, म्हणजेच त्याचा वापर कोणाला नुकसान पोहचवणार किंवा तिरस्कार करणारा नसावा.
‘फेसबुक लाइव्ह’च्या ‘‘वन स्ट्राइक’’ धोरणाचं उल्लंघन केल्यावर तसेच नियम मोडणाऱ्यांवर फेसबूक लाईव्हसाठी बंदी आणली जाणार आहे. रोसेन म्हणाले, कोणत्या संदर्भाशिवाय दहशतवाद्यांचे वक्तव्य प्रसारीत करणे, हे देखील उल्लंघन मानलं जाईल.
रोसेन यांनी सांगितलं की, लोकांनी व्हीडियो अपलोड केलेली वॉलपोस्ट शेअर केली, यामुळे लाईव्ह थांबवणं आम्हाला कठीण झालं होतं. खंरतर हे गरजेचे आहे की लोकांनी जाणूनबुजून असे केले.
फेसबूकने घोषणा केली की, फोटो आणि व्हीडियो आणि विश्लेषण तंत्रज्ञानात सुधार करण्यासाठी, अमेरिकेच्या ३ महाविद्यालयांसोबत, संशोधन भागीदारीवर ७५ लाख डॉलर खर्च करत आहे.