close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

फेसबुककडून अनावधानाने १५ लाख यूजर्सचे ई-मेल आयडी अपलोड

चुकीने अपलोड करण्यात आलेले ई-मेल आयडी कोणासोबतही शेअर करण्यात आले नाहीत

Updated: Apr 21, 2019, 02:23 PM IST
फेसबुककडून अनावधानाने १५ लाख यूजर्सचे ई-मेल आयडी अपलोड

नवी दिल्ली : सोशल मीडिया वेबसाइट फेसबुककडून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. मे २०१६ मध्ये फेसबुककडून १५ लाख यूजर्सचे ई-मेल आयडी अपलोड केल्याचे सांगण्यात आले आहे. गोपनियतेच्या बाबतीत फेसबुकसाठी ही एक समस्या बनली आहे. मार्चमध्ये फेसबुककडून सांगण्यात आले की, एक पर्याय म्हणून पहिल्यांदाच साइनअप करणाऱ्या यूजर्सला ई-मेल पासवर्ड वेरिफिकेशन करणे बंद करण्यात आले होते. परंतु ज्यावेळी पुन्हा यूजर्सनी फेसबुकवर अकाउंट तयार केले त्यावेळी अपोआप ईमेल अपलोड होण्यास सुरुवात झाली असल्याचे फेसबुककडून सांगण्यात आले. 

कंपनीकडून चुकीने अपलोड करण्यात आलेले ई-मेल आयडी कोणासोबतही शेअर करण्यात आले नसून या चुकीला दुरुस्त करण्यात आल्याचे फेसबुककडून सांगण्यात आले आहे. ज्या यूजर्सचे ईमेल अपलोड करण्यात आले आहेत त्यांना कंपनीकडून नोटीफिकेशन पाठवण्यात येणार आहे. तसेच ही समस्या सोडवण्यात आल्याचेही फेसबुककडून सांगण्यात आले आहे. 

गेल्या वर्षी लंडनमधील पॉलिटिल कंसल्टेंसी फर्म कॅब्रिज अॅनालिटिकाकडून फेसबुकचा डेटा लीक झाल्याचे समोर आले होते. या घटनेने संपूर्ण जगभरात मोठी खळबळ उडाली होती. या संपूर्ण प्रकरणी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितली होती. कॅब्रिज अॅनालिटिकाने फेसबुकच्या जवळपास ८.७ कोटी यूजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती देण्यात आली होती. फेसबुकच्या डेटा लीक प्रकरणी चौकशी करणाऱ्या फेडरल ट्रेड कमीशनने फेसबुकने २०११ मध्ये तयार करण्यात आलेल्या सेफगार्ड यूजर्स प्रायव्हसच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगतिले होते.