Facebook युजर्सचा डेटा लीक, कंपनीने लगेचच करायला सांगितली ही गोष्ट

फेसबूक युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने सर्व युजर्ससाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Updated: Oct 7, 2022, 10:46 PM IST
Facebook युजर्सचा डेटा लीक, कंपनीने लगेचच करायला सांगितली ही गोष्ट title=

मुंबई : डिजिटल क्रांतीमुळे जगात बरेच बदल झाले आहेत. जग आणखी जवळ आलं आहे. वेगवेगळ्या देशातील व्यक्ती एकमेकांसोबत चॅट करत आहेत. ज्याची सुरुवात फेसबूकपासून (Facebook) झाली. जगात क्वचितच असा कोणी व्यक्ती असेल जो फेसबुक वापरत नाही. प्रत्येकाच्या अँड्रॉइड फोनमध्ये फेसबूक अॅप सापडेल. मात्र गेल्या काही वर्षांपासून फेसबुकच्या डेटा लीकची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे युजर्सच्या गोपनीयतेवर (Facebook Privacy) प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पुन्हा एकदा डेटा चोरीचे प्रकरण समोर आले आहे.

वृत्तसंस्थेनुसार, मेटाने (META) शुक्रवारी युजर्सला सूचना दिल्या आहेत. पासवर्डसह दहा लाख युजर्सची माहिती लीक झाली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, यूजर्सचा हा डेटा थर्ड पार्टी अॅप्सच्या माध्यमातून लीक झाला आहे. या वर्षी आतापर्यंत मेटाने 400 हून अधिक अॅप्लिकेशन्स ओळखले आहेत जे Apple किंवा Android वरून डेटा चोरण्यासाठी डिझाइन केलेले होते, कंपनीचे अधिकारी डेव्हिड अॅग्रॅनोविच यांनी एका ब्रीफिंग दरम्यान सांगितले. हे अॅपल आणि गुगल अॅप स्टोअरवर सहज उपलब्ध आहेत. कंपनीने यूजर्सना ताबडतोब पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे.

"हे अॅप्स Google Play Store आणि Apple च्या App Store वर सूचीबद्ध केले गेले होते आणि ते फोटो एडिटर, गेम, VPN सेवा इत्यादी सारख्या ऍप्लिकेशन्स म्हणून दर्शविले गेले होते," मेटा यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे.

मेटाच्या सुरक्षा टीमच्या म्हणण्यानुसार, फीचर्स वापरण्याच्या बदल्यात अॅप्स अनेकदा लोकांना फेसबुक अकाउंट्समध्ये लॉग इन करण्यासाठी वापरकर्त्यांची नावे आणि पासवर्ड चोरत होते. त्यानंतर ते फेसबुकवरून डेटा आणि पासवर्ड चोरत होते.

झुकेरबर्गवर ५ अब्ज डॉलर्सचा दंड

2019 मध्ये फेसबुकला फेडरल ट्रेड कमिशनने 2018 मध्ये कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा लीक केल्याप्रकरणी $ 5 बिलियन दंड ठोठावला होता. 2018 मध्ये केंब्रिज अॅनालिटिकाचं प्रकरण समोर आलं होतं. लंडनस्थित कंपनीकडे 2015 पासून फेसबुक युजर्सचा डेटा होता आणि तो अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत वापरला गेला. या वर्षी झुकेरबर्गवर पुन्हा एकदा खटला दाखल करण्यात आला.