नवी दिल्ली : आजकाल तरुणाईमध्ये व्हिडिओची क्रेझ दिसून येते. लोकांना काही वाचण्यापेक्षा काही ऐकणे, पाहणे अधिक आवडते. म्हणून तुम्हालाही व्हिडिओ संदर्भात काही काम करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.
व्हिडिओ क्रिएटर्ससाठी YouTube व्यतिरिक्त अजून एक पर्याय उपलब्ध आहे. YouTubeला टक्कर देण्यासाठी फेसबुकने व्हिडिओ वेबसाईट क्रिएटर लॉन्च केली आहे. यावर देखील तुम्ही तुमचे व्हिडिओ अपलोड करू शकता, सर्च करू शकता, लाईक व कमेंट देखील करू शकता.
इतकंच नाही तर यू-ट्यूबच्या माध्यमातून तुम्ही कमाईही करू शकता. सध्या फेसबुक क्रिएटरवर फक्त रजिस्ट्रेशन होत आहे. लवकरच यातून कमाईची संधी उपलब्ध होणार असल्याचे फेसबुकने सांगितले. वेबसाईटशिवाय याचा अॅप देखील लॉन्च केला जाईल. मात्र हे फक्त iOS यूजर्ससाठी असेल. पण लवकरच अॅनरॉई़ड युजर्ससाठी ही अॅप लॉन्च करण्यात येईल.
तुम्हाला फेसबुक क्रिएटरवर रजिस्ट्रेशन करायचे असल्यास सर्वात आधी www.facebook.com/creators या वेबसाईटवर जा. त्यानंतर ज्वाईनवर क्लिक करा. यासोबतच फेसबुक अकाऊंट लॉगईन असणे गरजेचे आहे. त्यानंतर आवश्यक ते डिटेल्स देणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला आपल्या व्हिडिओ चॅनलची यूआरएल द्यावी लागेल.
त्यानंतर लेट्स डू वर क्लिक करा. यावर क्लिक केल्यावर तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर फेसबुक तुम्हाला ईमेलवरून टर्म्स व कंडीशनची पुर्ण माहिती देईल. ते वाचून तुम्ही फेसबुक व्हिडिओ चॅनलचे प्लॅनिंग करू शकता.
फेसबुक क्रिएटरवरून पैसे कमवण्याचे चार मार्ग आहेत. ब्रांडेड कंटेंट, मर्चेंडाइज, टूर्स आणि अॅड ब्रेक्स. यात अॅड ब्रेक्स सर्वात महत्त्वाचे आहे. अधिकतर लोक यातून कमाई करतात. अॅड ब्रेक्समध्ये तुमच्या व्हिडिओमध्ये अॅड्स येतात. हा सध्या प्रक्रिया सुरू असून ते लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. हे सुरू झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओतून चांगली कमाई करू शकतात.