फ्लिपकार्टच्या 'फ्रीडम’ सेलमधून ग्राहकांसाठी खास ऑफर

 अमेझॉनच्या नुकत्याच झालेल्या सेलमधून काही वस्तू घ्यायच्या राहील्या असतील तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण फ्लिपकार्ट ग्राहकांसाठी नव्या ऑफर्स घेऊन आले आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 8, 2017, 01:05 PM IST
फ्लिपकार्टच्या 'फ्रीडम’ सेलमधून ग्राहकांसाठी खास ऑफर title=

मुंबई : अमेझॉनच्या नुकत्याच झालेल्या सेलमधून काही वस्तू घ्यायच्या राहील्या असतील तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण फ्लिपकार्ट ग्राहकांसाठी नव्या ऑफर्स घेऊन आले आहे. 

फ्लिपकार्टचा ‘द बिग फ्रीडम सेल’ 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत असणार आहे.

या सेलमध्ये मोबाइल फोन, टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट, हेडफोन, कॅमेरा आणि अक्सेसरीजवर घसघशीत सूट मिळणार आहे. तसेच या सेलमध्ये एचडीएफसीच्या क्रेडिट कार्ड यूजर्संना या सेलमध्ये खास फायदा होणार आहे. कारण क्रेडिट कार्डच्या वापरावर त्यांना अतिरिक्त सूटही मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 रेडमीचा फोन घेण्यासाठी यात सहभागी होत असाल तर तुमच्याकडे जास्त अवधी असणार आहे. शाओमीच्या रेडमी नोट 4ची विक्री तब्बल 72 तास सुरु असणार आहे. कोणकोणत्या ऑफर असणार आहेत हे फ्लीपकार्टतर्फे अद्याप सांगण्यात आले नाही. पण काही ठराविक ऑफर्सबाबत मात्र माहिती दिलेली आहे.

ग्राहकांना या आहेत खास ऑफर

गुगल पिक्सल XL या स्मार्टफोनवर देखील बरीच सूट मिळणार आहे. ६७,००० किंमतीचा हा स्मार्टफोन ४८,९९९ रुपयांना मिळणार आहे. या सेलमध्ये आणखी किती ऑफर असणार हे ९ ऑगस्टलाच समोर येणार आहे.

मोटो M आणि मोटो G5 प्लसची किंमत १५,९९९ रुपये आणि १६,९९९ रुपये आहे. पण या सेलमध्ये हे फोन १२,९९९ रुपये आणि १४,९९९ रुपयांना उपलब्ध असणार आहे. याप्रमाणेच इतरही स्मार्टफोनवर बरीच सूट असणार आहे. त्यामूळे ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेण्याची मोठी संधी आहे.