BGMI Users : भारतात पुन्हा परतणार बीजीएमआय, जाणून घ्या संपूर्ण सत्य

भारत सरकारने अलीकडेच Google आणि Apple ला Battlegrounds Mobile India (BGMI) गेम Play Store वरून काढून टाकण्यास सांगितले होते. आता, बीजीएमआय अॅप भारतात...

Updated: Aug 12, 2022, 11:50 AM IST
BGMI Users : भारतात पुन्हा परतणार बीजीएमआय, जाणून घ्या संपूर्ण सत्य  title=

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच Google आणि Apple ला Battlegrounds Mobile India (BGMI) गेम Play Store वरून काढून टाकण्यास सांगितले होते. आता, बीजीएमआय अॅप भारतात डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नाही. या बंदीमुळे (Users) कमालीचे निराश झाले आहेत. अशातच या यूजर्ससाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे. BGMI अॅप भारतात पुन्हा आणण्यासाठी (India) गेमिंग कंपन्याकडून भारत सरकारला विनंतीचे पत्र व्यवहार करण्यात येत आहे. 
  
यावेळी गेंमिग कंपन्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भारतातील गेमिंग इकोसिस्टमला चालना देण्यासाठी विनंती केली आहे. दरम्यान BGMI माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 69A अंतर्गत ब्लॉक करण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की हा तोच कायदा आहे, ज्या अंतर्गत दोन वर्षांपूर्वी PUBG मोबाइल आणि टिकटॉकवर बंदी घालण्यात आली होती.

क्राफ्टन किंवा भारत सरकारने अॅप ब्लॉक करण्याचे कारण सांगितले नाही. परंतु काही अहवाल असे सूचित करतात की गेम ब्लॉक करण्यात आला आहे कारण सरकारला भीती होती की BGMI वापरकर्त्याचा डेटा चीनला पाठवत आहे.