मुंबई : मनोरंजन आणि चांगला कन्टेट पाहण्यासाठी अनेक लोक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. परंतु Hotstar, Netflix-Amazon Prime सारखा ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी त्याचं सब्सक्रिप्शन घेण्याची गरज भासते. सब्सक्रिप्शनसाठी लोकांना पैसे भरावे लागतात. म्हणेज तुम्हाला ते मोबाईल पॅक प्रमाणे एक महिना, सहा महिने किंवा वर्षभरासाठी त्याचं सदसत्व घ्यावं लागतं. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आता तुम्हाला हे सगळं फ्रीमध्ये पाहाता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला Hotstar, Netflix किंवा Amazon Prime वरील कन्टेन्ट किंवा सिनेमा पाहण्यासाठी आता वेगळे पैसे देण्याची गरज नाही. आता हे कसं शक्य आहे? आणि तुम्हाला ते कसं मिळवता येईल याबद्दल माहिती करुन घ्या.
तुम्हाला जर Hotstar, Netflix किंवा Amazon Prime फ्रीमध्ये वापरायचा असेल, तर त्यासाठी तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक असणे गरजेचं आहे. कारण तुम्हाला मुकेश अंबानीं यांच्या टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच हे ओटीटी प्लॅटफॉर्म फ्रीमध्ये पाहाण्याची संधी देत आहेत.
आज आम्ही तुम्हाला Jio सोबतच्या अशाच दोन योजनांबद्दल सांगणार आहोत, Disney Plus Hotstar, Netflix आणि Amazon Prime Video या तिन्ही OTT अॅप्सचा लाभ देतात.
या Jio प्रीपेड प्लॅनसह, कंपनी 100 GB हाय-स्पीड डेटा ऑफर करत आहे, तसेच तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएस प्रतिदिन मिळतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला 200 GB डेटा रोलओव्हरची सुविधा देखील मिळेल.
या Jio रिचार्ज प्लॅनसह, कंपनी कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 75 GB हाय-स्पीड डेटासह दररोज 100 SMS ऑफर करते.
वर नमूद केलेल्या दोन्ही जिओ प्लॅनसह, कंपनी 1 वर्षासाठी Disney + Hotstar, Amazon Prime Video आणि Netflix चा लाभ देते. याशिवाय, तुम्हाला Jio Tv, Jio Cinema यासह इतर Jio अॅप्सवर मोफत प्रवेश मिळेल. याचा अर्थ असा की जर तुम्हाला Disney Plus Hotstar, Netflix आणि Amazon Prime Video पाहायचा असेल तर तुम्हाला सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही, तुम्ही यापैकी कोणत्याही प्लॅनमधून रिचार्ज करू शकता आणि त्याचा मोफत लाभ घेऊ शकता.
तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि तुमच्या मित्रांनाही हे सांगा, ज्यामुळे तुम्हाला फायद्याची डिल करण्यात मदत मिळेल.