मुंबई : चॅटिंगसाठी व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यूझर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅप नवनवीन अपडेट्स आणत असतं. व्हॉट्सअॅपने आता मल्टी डिव्हाईस सर्व्हिसचं बीटा व्हर्जन लॉन्च केला आहे. यानुसार यूझर्स स्वत:च्या स्मार्टफोन व्यतिरिक्त 4 ठिकाणी डेस्कस्टॉप किंवा वेबवर व्हॉट्सअॅप सुरु करता येणार आहे. विशेष म्हणजे स्मार्टफोनमधील इंटरनेट कनेक्शन बंद असतानाही तुम्ही चॅट करु शकता. थोडक्यात काय तर विना इंटरनेट तुम्ही चॅट करु शकता. तसेच यूझर्स एन्ड टु एन्ड एन्क्रिप्शनसह या अॅपचा वापर करु शकतात. (good news for whatsapp users now use app in 4 devices know the details)
Very excited to be launching a beta of our new multi-device capability for @WhatsApp. Now you can use our desktop or web experiences even when your phone isn't active and connected to the internet. All secured with end-to-end encryption.
Learn more: https://t.co/AnFu4Qh6Hd
— Will Cathcart (@wcathcart) July 14, 2021
मोबाईलद्वारे आपण डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप सुरु करतो. पण मोबाईल स्वीच ऑफ झाल्यानंतर वेब व्हॉट्सअॅप काम करत नाही. पण या व्हर्जनमध्ये मोबाईल (Main Device) स्वीच ऑफ झाल्यानंतरही चॅट करु शकता.
व्हॉट्सअॅपचे सर्वेसर्वा विल कैथकार्ट म्हणाले की, युझर्सचा डेटा सिन्क करण्यासाठी एन्ड टु एन्ड एन्क्रिपशनसाठी सर्व डिव्हाईसमध्ये नव्या टेक्नोलॉजीचा प्रयोग केला गेला आहे. यामध्ये नाव, चॅट, स्टार मेसेजचा समावेश आहे. आतापर्यंत आपल्याला एकावेळेस वेब व्हॉट्सअॅप वापरता येत होतं. त्यामुळे आता मोबाईल स्वीच ऑफ झाल्यावरही अडथळ्याशिवाय व्हॉट्सअॅपचा वापर करता येणार आहे.