नवी दिल्ली : स्मार्टफोन हा जीवनावश्यक गरज बनला आहे. आताच्या युगात त्याच्याशिवाय कल्पनाही होऊ शकत नाही. पण स्मार्टफोनच्या वापरापेक्षा फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते यामुळे बहुतांशी जण वैतागलेले असतात.
मीडिया सूत्रांनुसार, भविष्यात असे फोन येणार आहेत की ते तीन महिन्यात फक्त एकदा चार्ज केले तरी चालू शकणार आहेत. वैज्ञानिकांनी अशी टेक्नॉलॉजी शोधून काढली आहे की त्यामुळे तुम्हांला तुमचा फोन तीन महिन्यातून एकदाच चार्ज करावा लागू शकतो.
वैज्ञानिकांनी असे मेटिरिअल तयार केले आहे, त्याच्यामुळे आपल्या स्मार्टफोनचा प्रोसेसर १०० पट कमी उर्जेचा वापर करतो. मिशिगन आणि कॉर्नेल युनिवर्सिटीच्या रिसर्चर्सने मॅग्नेटोइलेक्ट्रीक मल्टीफेरिक नावाचा पदार्थ शोधून काढला आहे.
हा पदार्थ अणूंच्या पातळ आवरणाचे निर्माण करतो. तो चुंबकीय ध्रुवीय फिल्म तयार करतो. याचा वापर उर्जेच्या एका छोट्या भागाचा वापर डेटा रिसीव्ह आणि सेंड करण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी जास्त दिवस चालू शकते.
सध्या जे प्रोसेसर बनवले जातात ते सेमीकंडक्टर बेस्ड सिस्टिमद्वारे तयार केले जातात. अशा प्रोसेसरला कायमस्वरूपी करंटचा फ्लो पाहिजे असतो. हा शोध लागल्यानंतर असे म्हटले जात आहे की यामुळे स्मार्टफोनच्या क्षेत्रात क्रांतीकारी बदल होऊ शकतो. त्यामुळे उर्जेची बचतही होऊ शकते.