गुगलने मुलाखतीतील या १२ प्रश्नांवर घातली बंदी

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलमध्ये नोकरी मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न असते. गुगलमध्ये जॉब मिळवणे काही सोपे नसते. नोकरी मिळवण्याची प्रक्रिया कठीण असते. 

Updated: Oct 28, 2017, 11:23 AM IST
गुगलने मुलाखतीतील या १२ प्रश्नांवर घातली बंदी title=

मुंबई : जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलमध्ये नोकरी मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न असते. गुगलमध्ये जॉब मिळवणे काही सोपे नसते. नोकरी मिळवण्याची प्रक्रिया कठीण असते. 

नोकरीच्या मुलाखतीदरम्यान असे काही प्रश्न विचारले जातात ज्यांची उत्तरे देणे कठीणच नसते तर अनेकदा शक्यही नसते. मात्र आता हे सोपे होणार आहे. गुगलने मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या १२ प्रश्नांवर बंदी घातलीये. आता मुलाखतीत हे १२ प्रश्न विचारले जाणार नाहीत. 

जाणून घ्या कोणते आहेत हे प्रश्न

1. सिएटलमध्ये सर्व खिडक्या धुण्यासाठी तुम्ही किती रुपये घ्याल?
२. मेनहोलचे झाकण गोल का असते?
३. संपूर्ण जगात किती पियानो ट्यूनर्स आहेत?
४. एक व्यक्ती आपली कार घेऊन हॉटेलमध्ये गेला आणि नशीब गमावून बसला? काय झाले त्याच्यासोबत?
५. घड्याळ्याचे काटे दिवसातून कधी एकत्र येतात?
६. अमेरिकेत दरवर्षी किती व्हॅक्युल क्लीनर बनतात?
७. सॅन फ्रॅन्सिस्कोमधून बाहेर पडण्यासाठी एक प्लान सांगा 
८. डेड बीफचे महत्त्व सांगा
९. एक व्यक्ती फोनवर सलग नंबर डायल करेल तर त्या नंबरने कोणता शब्द तयार होईल.
१०. एका स्कूल बसमध्ये तुम्ही किती गोल्फ बॉल फिट करु शकता?
११. तुम्हाला ए पॉईंटवरुन बी पॉईंटवर जायचे आहे. मात्र तुम्हाला माहीत नाही कसे जायचे ते तर तुम्ही काय कराल?
१२. तुमच्या ८ वर्षाच्या भाच्याला तीन वाक्यात डेटाबेस समजावून सांगा

याआधीही काही प्रश्नांवर घालण्यात आली होती बंदी

२०११मध्ये गुगलने अशाच प्रकारे १५ प्रश्नांवर बंदी घातली होती. मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नांचा काही संबध नसल्याने या प्रश्नांवर बंदी घालण्यात आली होती.