डूडलच्या माध्यमातून गुगलने काढली हर गोविंद खुरानांची आठवण

डूडलच्या माध्यमातून गुगल हे नेहमीच जगभरातील अनेक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि घडामोडी यांबाबतच्या आठवणींना उजाळा देते. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 9, 2018, 04:14 PM IST
डूडलच्या माध्यमातून गुगलने काढली हर गोविंद खुरानांची आठवण title=

मुंबई : डूडलच्या माध्यमातून गुगल हे नेहमीच जगभरातील अनेक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि घडामोडी यांबाबतच्या आठवणींना उजाळा देते. तसेच, अनेक ज्वलंत विषयांवर भाष्यही करते. आजही गुगलने अशाच एका व्यक्तीमत्वावर डूडल बनवले आहे. या व्यक्तिमत्वाचे नाव आहे, प्रोफेसर हरगोविंद खुराना.

हरगोविंद खुराना हे भारतीय वैज्ञानिक आहेत. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९२२मध्ये पंजाबमध्ये झाला. खुराना यांनी सर्वात आगोदर प्रोटीन सेंथेसिसमधील न्यूक्लियॉटाइडचे महत्त्व ओळखले होते. याशीवाय जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या टेस्ट ट्यूब बेबबीचेही परिक्षण केले होते. तसेच, हा प्रयोग किती संभवनीय आहे याचाही शोध घेतला होता.

विज्ञानामध्ये दिलेल्या अमुलाग्र योगदानाबद्दल प्रोफेसर खुराना यांना १९६८मध्ये संशोधन क्षेत्रातील नोबेल पुरस्कानेही सन्मानीत करण्यात आले होते. याशिवाय पद्म विभूषण, विलियर्ड गिब्स अवार्ड, अलबर्ट लास्कर अवार्ड आणि गार्डनर फाऊंडेशन इंटरनॅशनल अवार्ड यांसारख्या प्रतिष्ठीत आणि तितक्याच लोकप्रिय पुरस्कारांनीही खुराना यांना सन्मानीत करण्यात आले होते.

डीएनए अॅनेलिसीस अभ्यासक असलेल्या डॉ. हर गोविंद खुराना यांना भारतात हव्या त्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी केंब्रिज विद्यापीठात जाण्याचा निर्णय घेतला. ते केंब्रिज विद्यापीठातच राहीले आणि त्यांनी तेथेच संशोधन केले. मॉलिक्यूलर बायॉलजीमध्ये सखोल संशोधन आणि अभ्यास करणाऱ्या प्रोफेसर खुराना यांनी ९ डिसेंबर १९११ला अखेरचा श्वास घेतला.