गूगलने जगातील पहिले रिटेल स्टोअर उघडले, पाहा त्याचा जबरदस्त थाट

गूगलने  (Google) न्यूयॉर्कमध्ये पहिले रिटेल स्टोअर ( Retail Store) उघडले आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 19, 2021, 03:43 PM IST
 गूगलने जगातील पहिले रिटेल स्टोअर उघडले, पाहा त्याचा जबरदस्त थाट title=

मुंबई : गूगलने  (Google) न्यूयॉर्कमध्ये पहिले रिटेल स्टोअर ( Retail Store) उघडले आहे. (Google has opened its first retail store in New York) हे स्टोअर 5000 चौरस फूट क्षेत्रात विस्तारलेले आहे. या स्टोअरवरून ग्राहक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संदर्भातील उत्पादने खरेदी करु शकतात. या दुकानात पिक्सेल फोन, WearOS, Nest आणि Fitbit  सारखी उपकरणे उपलब्ध असतील. गूगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, आपण या हायटेक स्टोअरची अंतर्गत सजावट पाहिली तर तुम्ही चकीत व्हाल आणि म्हणाल काय आहे हा थाट!

Google opens worlds first retail store

अॅपलच्या (Apple) मार्गाचे अनुसरण करत टेक जाएंट Googleने न्यूयॉर्कमध्ये जगातील पहिले रिटेल स्टोअर उघडले आहे. गूगलच्या या दुकानात कंपनी आपली हार्डवेअर उत्पादने आणि इतर अनेक प्रकारची उत्पादने विकेल. हे स्टोअर 24 भाषांमध्ये ग्राहकांना उपलब्ध असेल.ग्राहक या रिटेल स्टोअरमध्ये प्रवेश करताच, त्याला प्रथम एक भौतिक आणि डिजिटल उत्पादनाचा डिस्प्ले दिसेल. यानंतर, त्यांना एक लाईटच्या प्रकाशात झगमगलेली खोली दिसेल जिथे काही Googleची उत्पादने ठेवलेली पाहायला मिळतील. हे रिटेल शॉप आलिशान पद्धतीने तयार गेले आहे.

Google opens worlds first retail store

हे गूगल शॉप न्यूयॉर्क शहरातील चेल्सी भागात आहे. हे गूगल स्टोअर 5000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. येथे ग्राहक गूगल-निर्मित हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर खरेदी करू शकतात. या दुकानात पिक्सेल फोन, WearOS, Nest आणि Fitbit  सारखी उपकरणे उपलब्ध असतील. एवढेच नाही तर ते पाहणेही एक आकर्षक आहे. येथे आपण आपले Google उत्पादनाची सेवा देखील मिळू शकेल.

Google opens worlds first retail store

गूगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी कंपनीच्या पहिल्या रिटेल स्टोअरबद्दल ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी कंपनीचा पहिले स्टोअर उघडल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'ज्या ठिकाणी हे स्टोअर आहे त्या ठिकाणी एलईडी प्लॅटिनम रेटिंग आहे. जेव्हा ते न्यूयॉर्कला येतील तेव्हा या स्टोअरला भेट देतील असेही त्यांनी म्हटले आहे.

Google opens worlds first retail store

हे स्टोअर हायटेक आणि आकर्षक बनविण्यात आले आहे. ग्राहकांच्या आनंदात एक गेमिंग क्षेत्र तयार केले गेले आहे. होम थिएटर टेस्टिंगसाठी साऊंडप्रूफ रूमही बनविण्यात आल्या आहेत. जर एखादा ग्राहक गूगलचा पिक्सेल फोन वापरतो आणि त्यामध्ये काही दोष आढळतो तर तो या रिटेल स्टोअरमध्ये त्याचे काम करुन घेऊ शकतो.

Google opens worlds first retail store

हे रिटेल स्टोअर जिथे उघडलेले आहे ते आधी पोस्ट ऑफिस आणि स्टारबक्स कॅफेटेरिया होते. नवीन कॉर्पोरेट जमीनदारांच्या नियमांतर्गत, जेव्हा या दोघांचा लीज कालावधी संपला, तेव्हा तो रिकामा झाला. आणि आता हे गूगल शॉप तिथे उघडले आहे.