Google वर चुकूनही हे सर्च करु नका? होऊ शकते मोठे नुकसान

Google Search करताना बरेचवेळा तुम्हाला काही गोष्टी माहीत नसतात. त्यावेळी तुम्ही अशा गोष्टी गूगलवर शोधण्याचा प्रयत्न टाळला पाहिजे.

Updated: Mar 2, 2021, 03:27 PM IST
Google वर चुकूनही हे सर्च करु नका? होऊ शकते मोठे नुकसान

मुंबई : Google Search : बरेचवेळा तुम्हाला काही गोष्टी माहीत नसतात. त्यावेळी तुम्ही गूगलचा (Google) आधार घेता. मात्र, त्यावेळी तुम्हाला हे माहीत नसते की, काय सर्च केले की तुमचे नुकसान होते. कधी कधी तुम्ही जे शोधत आहात, त्यामुळे तुमचे नुकसान होते. (Google Search) त्यामुळे डोक्याला हात लावण्याची वेळ येते. किंवा ज्या शोधण्यामुळे तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा गोष्टी गूगलवर शोधण्याचा प्रयत्न टाळला पाहिजे.

काही अडले की आपण थेट गूगलला (Google) पहिली पसंती देतो. Google हे सर्वात वेगवान आणि विश्वासार्ह व्यासपीठ मानले जाते. तथापि, आपल्याला माहिती नाही की अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपण शोधण्यापासून टाळल्या पाहिजेत. बातमीनुसार गूगलवर अशी काही माहिती उपलब्ध आहे, ज्यांचा शोध तुमच्या अडचणीत भर पडते. 

अ‍ॅप्स किंवा सॉफ्टवेअर ((Apps or software)

आज आपल्या हातात स्मार्टफोन आला आहे. त्यामुळे सहसा आपण सर्वजण अ‍ॅप्स आणि सॉफ्टवेअर वापरतो. कारण आजकाल अॅप्सच्या माध्यमातून सर्व काही करणे आणि शोधणे खूप सोपे झाले आहे. परंतु, या गोष्टीचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी अशीच अॅप्स आणि सॉफ्टवेअर गूगल सर्चमध्ये टाकतात. आपण त्यांना डाउनलोड करताच आपल्या फोन आणि संगणकावरून महत्वाची माहिती चोरली जाते. आपल्या फोन आणि संगणकात व्हायरस घुसण्याचा धोका देखील वाढतो.

बँक वेबसाइट (Bank website)

आपण बर्‍याचदा ऑनलाईन बँकिंग करतो. आमच्या सहयोगी वेबसाइट bgr.in च्या मते, आपण कधीही बँकिंगसाठी Google सर्ज करु नये. आजकाल सायबर गुन्हेगार बँकेच्या फसवणुकीसाठी बँकेची बनावट वेबसाइट (Bank website) बनवतात. ही अगदी हुबेहुब बँकेसारखे दिसते. या साइटच्या मदतीने गुन्हेगार आपले बँकिंग तपशील चोरू शकतात. आपले बँक खाते रिकाने देखील होऊ शकते.

शासकीय योजना (Government scheme)

या दिवसांमध्ये सरकारी योजनांच्या माध्यमातून लोकांकडून फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. यामुळेच कोणत्याही सरकारी योजनेची माहिती गूगलवर शोधू नये. आपण अधिकृत साइटवर जाऊन सरकारी योजनांची माहिती मिळवणे चांगले.

कूपन कोड (Coupon code)

आजकाल ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) दरम्यान कूपन अनेक कोडद्वारे सूट दिली जाते. परंतु कधीकधी आपण विनामूल्य कूपन कोड शोधण्यासाठी Google वर सर्च करतो. तज्ज्ञ सांगतात की, कूपन कोड शोधण्यासाठी गूगलचा आधार घेऊ नका. हॅकर्स आणि सायबर गुन्हेगार बनावट कूपन कोडच्या बदल्यात आपली विविध प्रकारच्या वैयक्तिक आणि बँक माहिती गोळा करतात आणि आपल्याला आमिष दाखवू शकतात. अशा परिस्थितीत आपण केवळ अधिकृत साइटवर किंवा ब्रँड किंवा कंपनीच्या अ‍ॅपवर दिलेल्या ऑफरच वापराव्या.

ग्राहक सेवा (Customer Care)

Google Search मध्ये कस्टमर केअर नंबरही शोधू नका. येथे सायबर गुन्हेगार आपल्याला चुकीचा ग्राहक सेवा क्रमांक देऊन आपली महत्वाची माहिती चोरू शकतो. नंतर या माहितीच्या सहाय्याने आपले आर्थिक नुकसान होऊ शकते.