सावधान! तुमच्या Smartphone वर व्हायरस करू शकतो Attack, वाचण्यासाठी करा ह्या ट्रिक्स

App डाऊनलोड करताना काळजी घ्या 

Updated: Nov 28, 2021, 02:19 PM IST
सावधान! तुमच्या Smartphone वर व्हायरस करू शकतो Attack, वाचण्यासाठी करा ह्या ट्रिक्स title=

मुंबई: बऱ्याचदा आपण इंटरनेटवरून फोटो डाऊनलोड करतो. गाणी किंवा महत्त्वाच्या फाइल डाऊनलोड करत असतो. अशावेळी कधीकधी व्हायरस येण्याचा किंवा हॅकिंगचा धोका असतो. बऱ्याचदा काही साईटवरून तुमचा डेटा चोरलाही जाण्याची शक्यता असते. या गोष्टी टाळण्यासाठी आणि आपल्या फोनमध्ये व्हायरस येऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत आज आपण हे जाणून घेणार आहोत. 

App डाऊनलोड करताना काळजी घ्या 
मोबाइल अॅप डाउनलोड करता तेव्हा फोनने तुमच्या अॅपला कोणत्या परवानग्या दिल्या आहेत याकडे विशेष लक्ष द्या. विनाकारण सर्वांना परवानगी देऊ नका. अशी काही अॅप्स आहेत जे तुमची माहिती घेऊन हॅकर्सपर्यंत पोहोचवू शकतात. त्यामुळे तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो. 

तुम्हाला जर अॅप डाऊनलोड करायचंच असेल तर विश्वसनीय साइटवरून ते डाऊनलोड करा. याशिवाय थर्ड पार्टी अॅप वापरणं टाळा जसं की व्हॉट्सअॅप प्लस सारखे अॅप्स. गुगल प्ले स्टोअरवरून शक्यतो अॅप डाऊनलोड करा. आपल्यापर्यंत आलेली प्रत्येक लिंक ही खरी असेलच असं नाही. बऱ्याचदा ती हॅकर्सकडूनही येण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे अशा लिंकवरून अॅप डाऊनलोड करण्याऐवजी गुगल प्ले स्टोअरची मदत घ्या. 

आपल्या फोनमध्ये आणि आपल्या सोशल मीडिया साइटवरील अकाऊंटचे पासवर्ड बदलते ठेवा. याशिवाय सोपे पासवर्ड तुमचं नाव, वाढदिवस किंवा तुमचं पूर्ण नाव असे पासवर्ड ठेवू नका. या ऐवजी शब्द, स्पेशल कॅरेटक्टर आणि अंक याचं कॉन्बिनेशन पासवर्डमध्ये ठेवा. त्यामुळे हॅकर्सला तुमच्यापर्यंत पोहोचणं शक्य होणार नाही.

सर्व अॅपमध्ये टू स्टेप व्हेरिफिकेशन किंवा टू फॅक्टर ऑथेन्टिफिकेशन कोडचा वापर करा. त्यामुळे तुमची माहिती अधिक सुरक्षित राहील. हॅकर्स तुमच्यापर्यंत सहज पोहोचू शकणार नाहीत. तुमचे पासवर्ड सोशल मीडियावर कुठेही मेसेजमध्ये शेअर करू नका. त्यामुळे तुमचा अकाऊंट हॅक झाला तर तुमचं नुकसान होऊ शकतं.