मुंबई : जगातील सर्वात मोठी टू-व्हिलर निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्प लवकरच Xtreme 200R बाईक भारतीय बाजारात उतरवणार आहे. Xtreme 200R आणि XPulse 200R यांच्याशिवाय हिरो आपल्या आणखीन दोन प्रीमियम बाईक मार्केटमध्ये उतरवण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या या दोन्ही बाईक २०० सीसी इंजिन क्षमतेच्या असतील. यामध्ये १८ बीएचपी पॉवर आणि १७ न्यूडन मीटरचा टॉर्क जनरेट होतो. याचं इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्ससहीत आहे.
हिरोच्या या दोन्ही बाईक Xtreme 200R आणि XPulse 200R वर आधारित असतील. या दोन्ही बाईकमध्ये सिंगल चॅनल एबीएस देण्यात आलाय. त्यामुळे या बाईक आता भारतीय सुरक्षा नियमही फॉलो करतात. उल्लेखनीय म्हणजे, भारत सरकारच्या नियमांनुसार, १२५ सीसीच्या कोणत्याही बाईकमध्ये सिंगल चॅनल एबीएस देणं अनिवार्य आहे.
या दोन्ही बाईक येत्या वर्षात अर्थात २०१९ मध्ये लॉन्च करण्यात येतील. या दोन्ही बाईकसहीत हिरोला आपल्या प्रीमिअम बाईक्सचा पोर्टफोलिओ आणखीन मजबूत करण्याचा विश्वास वाटतोय.