शानदार, जबरदस्त...! भारतात 5 सप्टेंबरला लाँच होणार इलेक्ट्रिक बाइक, 100kmph स्पीड आणि 150KM धावणार

हॉप इलेक्ट्रिक मोबिलिटीने आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक लाँच करणार आहे. या बाइकचं नाव Hop Oxo असेल.

Updated: Aug 25, 2022, 02:19 PM IST
शानदार, जबरदस्त...! भारतात 5 सप्टेंबरला लाँच होणार इलेक्ट्रिक बाइक, 100kmph स्पीड आणि 150KM धावणार  title=

Hop Oxo Electric Bike: देशात गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता इलेक्ट्रिक वाहनांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. ग्राहकांची मागणी पाहता भारतीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक बाईक येत आहे. हॉप इलेक्ट्रिक मोबिलिटीने आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक लाँच करणार आहे. या बाइकचं नाव Hop Oxo असेल. कंपनी 5 सप्टेंबर रोजी भारतात बाइकचं लाँचिंग करणार आहे. अहवालानुसार, Hop Oxo चा टॉप स्पीड 100 Kmph पर्यंत असू शकतो. म्हणजेच ही एक परफॉर्मन्स इलेक्ट्रिक बाइक असेल. कंपनीने या बाइकचा टीझर इमेज सादर केली आहे. यावरून बाइक आकर्षक असेल याचा अंदाज येतो. 

Hop Oxo या बाइककडे पाहिलं तर Yamaha FZ-Fi वर्जन 2 सारखी दिसते. सध्या मोटरसायकलच्या टेक्निकल स्पेसिफिकेशनबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या बाइकमध्ये एक मोठा बॅटरी पॅक असेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे बाइक एका चार्जनंतर 100 ते 150 किमीची रेंज देऊ शकेल. या बाइकला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि ट्विन रिअर शॉक दिले आहेत. तर ब्रेकिंगसाठी दोन्ही चाकांना सिंगल डिस्क ब्रेक दिले जाण्याची शक्यता आहे.

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही 999 रुपयांमध्ये ई-बाइक प्री-बुक करू शकता. कंपनीचे म्हणणे आहे की, बाइक लाँच होण्याआधीच तिला 5000 बुकिंग मिळाले आहेत. Hope Oxo ची किंमत सुमारे 1.20 लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे. रिव्हॉल्ट आरव्ही 400, टॉर्क क्रॅटोस आणि ओबेन रोर यांसारख्या बाइक्सशी थेट स्पर्धा करेल.