How to book Budget Flight Ticket? ऑक्टोबर- नोव्हेंबर महिना सुरु झाला, की भारतात खऱ्या अर्थानं पर्यटनाचा काळ सुरु होतो. मुळात मागील काही वर्षांमध्ये पर्यटनासाठी ठराविक असा काळ राहिलेला नाही. पण, नोकरदार वर्ग आणि शाळकरी मुलांना मिळणाऱ्या सुट्ट्या पाहता अनेकजण याच दिवसांमध्ये एखाद्या छानशा ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचे बेत आखतात. बरीच मंडळी रेल्वेनं प्रवासाला पसंती देतात. तर, काहीजण वेळ वाचावा यासाठी विमान प्रवासाला प्राधान्य देतात.
विमान प्रवास म्हटलं की अनेकांनाच अप्रूप वाटतं. कारण, अनेकदा विमान प्रवासाचं भाडंच इतकं असतं की किंमत पाहून आपण अशा दोन Trip करू असाही सूर काही मंडळी आळवतात. आता मात्र तुम्हाला असं म्हणण्याची संधीच मिळणार नाही. कारण, विमान प्रवासही तुमच्या खिशाला परवडणार आहे. इथं चक्क गुगल तुमची मदत करेल.
विमान प्रवास करण्यासाठीचे Latest दर माहिती करून घ्यायचे असतील तर तुम्हाला Google Flights मध्ये असणारा Price Tracking हा पर्याय Active करावा लागणार आहे. हे फिचर इनेबल करताच फ्लाईट रेट्स अर्थात विमानाच्या तिकीटांचे दर कमी होताच तुम्हाला तसं नोटिफिकेशनच येईल. अर्थात तुम्हाला सूचित केलं जाईल.
कसं अॅक्टिव्ह करावं फिचर?
मोबाईलमध्ये हे फिचर अॅक्टिव्ह करण्यासाठी Google अकाऊंटमध्ये Sign In करा. तुम्ही साईन इन केल्यानंतर तुम्हाला गुगल अनेक फ्लाईट्सवर एक रंगीत बॅज दाखवेल. म्हणजेच त्या विमानांचे दर बदलणार नाहीत. पण, काही फ्लाईट्सचे दर बदलताच गुगल तुम्हाला सूचित करेल. इतर खासगी अॅपच्या माध्यमातून फ्लाईटचे दर पाहण्यापेक्षा गुगलचं हे फिचर तुमच्या मोठ्या मदतीचं ठरेल आणि तुम्हाला वारंवार फ्लाईट दर तपासत रहावे लागणार नाहीत.
फ्लाईट तिकीट बुक करण्यासाठी इतरही अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यामध्ये बऱ्याचदा इंटरनेट सर्व्हरही मोठी भूमिका बजावतो. काहींच्या मते रात्री उशिरानं जेव्हा सर्व्हरवर अनेकजण काम करत नसतात तेव्हा विमान तिकीटं लगेच बुक होतात. शिवाय इनकॉग्निटो टॅबमधून तिकीट बुक केल्यास त्याचाही किंमतीवर परिणाम दिसून येतो. कमालीची बाब म्हणजे वारंवार एकाच वेबसाईटवर भेट न देता वेगवेगळ्या युजर अकाऊंटवरून तिकीटांचे दर तपासा इथंही लगेच फरक जाणवतो.