मुंबई : ट्रू कॅालरहा (TrueCaller) कॉलर आयडी ऍप आहे. ज्यामध्ये युझर्सना अनोन (Unknown) नंबरवरून येणारे कॉल ओळखण्यास मदत होते. जे स्पॅमर्स कॅाल आहेत, त्याची देखील माहिती या अॅपच्या माध्यमातून प्राप्त केली जाते.
ट्रू कॅालर (TrueCaller) वापरण्यासाठी आपल्याला ट्रू कॅालरवर आयडी तयार करावा लागेल आणि त्यामध्ये आपले नाव टाकावे लागेल. काही लोक त्यामध्ये आपले टोपण नावं देखील ठेवतात. जर कोणाचा ट्रू कॅालरमधून आपले नाव बदलण्याचा विचार आहे किंवा ऍपच्या यादीतून स्वत:चे नाव रद्द करायचे असेल तर, खालील गोष्टी फॅालो करा.
Step 1: आपल्या Android किंवा iOS फोनवर ट्रू कॅालर अॅप उघडा.
Step 2: iOS मधील More ऑप्शनवर टॅप करा. तसेच Android साठी डाव्या कोपऱ्यातून मेनू निवडा.
Step 3: येथे तुम्हाला Edit your Profile ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
Step 4: तुम्हाला येथे तुमचे डिटेल्स मिळतील.
Step 5: आता, तुम्हला ट्रू कॅालर (TrueCaller)आयडीसाठी जे नाव दाखवायचे आहे ते टाका. यानंतर सेव्ह (save) करा.
आपण डेस्कटॉपद्वारे देखील ट्रू कॅालरमधून आपले नाव बदलू शकता. यासाठी, Truecaller website> log into the platform with your details> Enter your phone number> Select the Suggest Name option>हे पर्याय निवडून नवीन नाव ऍड करा आणि सेव्ह करा.
Step 1: आपल्या फोनमध्ये अॅप उघडा.
Step 2: iOS मध्ये More आणि Android मध्ये Menu पर्यायावर क्लिक करा.
Step 3: आता सेटिंग्जच्या पर्यायावर क्लिक करा.
Step 4: येथून प्रायवेसी सेंटर ऑप्शन निवडा.
Step 5: आता Deactivate Account ऑप्शन निवडा.
Step 6: हे केल्यावर, Truecaller Unlist पेजवर जा.
Step 7: आता कंट्री कोड सोबत आपला मोबाईल ऍड करा.
Step 8: Analyst option वर टॅप करा आणि डिएक्टिवेशनसाठी कोणते ही कारण द्या.
Step 9: आता दिलेला CAPTCHA भरा. नंतर अनलिस्ट पर्यायावर टॅप करा. आपला फोन नंबर 24 तासांच्या आत अनलिस्ट
होईल.