मुंबई : कार प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, ह्युंदाई कंपनीने आपल्या i20 कारचं सीव्हीटी मॉडल भारतीय बाजारात लॉन्च केलं आहे. या गाडीचं ऑटोमॅटिक व्हर्जन दोन वेरिएंट मॅग्ना आणि ऐस्टामध्ये उपलब्ध आहे.
नव्या i20 ऑटोमॅटिकसोबत ह्युंदाईने आपल्या प्रतिस्पर्धी मारुती सुजुकी बलेनो आणि होंडा जॅजला टक्कर दिली आहे. ह्युंदाईची ही नवी कार ऑटो एक्सपोमध्येही लॉन्च करण्यात आली होती. या कारच्या पेट्रोल ऑटोमॅटिक वेरिएंटमध्ये मॅन्युअल वर्जन असलेल्या सर्व वैशिष्ट्ये आहेत.
2018 Hyundai i20 पेट्रोल ऑटोमॅटिकच्या सीव्हीटी वर्जनमध्ये 1.2 लीटर, 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 83bhp चं पावर जनरेट करतं.
2018 Hyundai i20 या कारच्या सीव्हीटी वेरिएंटमध्ये रिवाइज्ड बंपर, स्मोक्ड हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. तसेच ऑस्ट्रा ट्रिममध्ये डायमंड कट अलॉय व्हिल्ज, एलईडी टेललाईट्स आणि ड्यूअल टोन बंपर देण्यात आलं आहे. आय20 ऑटोमॅटिक मॉडेलमध्ये नवी टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आली आहे जी अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटोला सपोर्ट करते. i20 ऑटोमॅटिकमध्ये ड्युअल एअरबॅग्स, एबीएस आणि ईबीडी देण्यात आले आहेत.
i20च्या CVT वेरिएंटची बुकिंग याच महिन्यात सुरु झाली आहे आणि या गाडीची डिलिव्हरी ग्राहकांना महिन्याच्या अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.
ह्युंदाईने लॉन्च केलेल्या i20 CVT कारची सुरुवाती किंमत 7.4 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ऐस्टा वेरियंटची किंमत 8.1 लाख रुपये आहे. नव्या ह्युंदाई i20 पेट्रोल सीव्हीटीमध्ये जुन्या मॉडेलच्या 1.4 लीटर इंजिनला 4 स्पीड टॉर्क कनव्हर्टरने रिप्लेस करण्यात आलं आहे. यासोबतच नव्या कारच्या किंमतीतही कपात करण्यात आली आहे.