नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्यांमधील वॉर सातत्याने चालू आहेत. यासाठी कंपन्या वारंवार नवनवीन प्लॅन लॉन्च करत आहेत. आता आयडियाने नवीन प्लॅन सादर केला आहे.
आयडिया 309 रूपयात प्रत्येक दिवशी 1 जीबी डेटा देत आहे. त्याचबरोबर अनलिमिटेड लोकल व STD कॉलची सुविधा देखील मिळत आहेत. इतकंच नाही तर या प्लॅनमध्ये फ्रि आऊटगोइंग रोमिंग आणि 100 मेसेज पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे.
महत्त्वाचे म्हणजे जे ग्राहक हा प्लॅन माय आयडिया अॅपच्या अधिकृत वेबसाईटवरून करतील त्यांना 1 जीबी अधिक डेटा मिळेल. मात्र या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळवण्यासाठी आयडियाने एक अट लागू केली आहे. यात दर दिवशी 250 मिनिट आणि आठवड्यातून 1000 मिनिटे फ्री कॉलिंग मिळेल. हे लिमिट संपल्यानंतर कॉलिंगसाठी 1 पैसा प्रती सेकंद असा चार्ज असेल.
पण युजर्स 100 हून अधिक कॉल करू शकणार नाही. जिओच्या 309 रूपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी आयडियाने हा प्लॅन लॉन्च केला आहे.
दररोज 1 जीबी डेटा
49 दिवसांची व्हॅलिडिटी
रोज अनलिमिटेड इंटरनेट आणि कॉलिंग
मात्र एक अट
रोज हाय स्पीडचा फक्त 1 जीबी डेटा मिळेल. तो संपल्यानंतर इंटरनेट चालू राहील पण स्पीड कमी होवून 64kbps इतका असेल.