जर हे 11 अ‍ॅप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर लगेच डिलीट करा!

प्ले स्टोअरमध्ये असेही काही एप्स आहेत जो तुम्हाला मोठा फटका देऊ शकतात.

Updated: Jul 23, 2021, 12:35 PM IST
जर हे 11 अ‍ॅप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर लगेच डिलीट करा!

मुंबई : गुगल प्ले स्टोअरवर हजारो एप्स आहेत. युजर्स त्यांच्या गरजेनुसार ही एप्स डाऊनलोड करून त्याचा वापर करतात. मात्र प्ले स्टोअरमध्ये असेही काही एप्स आहेत जो तुम्हाला मोठा फटका देऊ शकतात. जर तुम्ही वेळेवर या एप्सकडे लक्ष दिलं नाहीत तर तुमच्या बँकींग डिलेट्ल देखील धोक्यात येऊ शकतात. अशाच काही व्हायरससंदर्भातील माहिती समोर आली आहे.

Zscalerच्या ThreatLabz सायबर सिक्युरीटी रिसर्चर्सने 11 एप्सबाबत माहिती दिली आहे, ज्यांच्यापासून लोकांना सावधान राहणं गरजेचं आहे. या एप्समध्ये जोकर फॅमिलीचे मेलवेअर आहे, जे तुमच्या स्मार्टफोनसाठी नुकसानदायक असतं. जोकरला लोकांची माहिती काढणं, ती चोरणं आणि एसएमएस मॉनिटर करण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे. 

हे स्पायवेअर अशा पद्धतीने डिसाईन केलं आहे की हे तुमचे एसएमएस, कॉन्टॅक्ट लिस्ट आणि डिवाइज इंफॉर्मेशन चोरी करू शकतं. त्याचसोबत हे तुमच्या नकळत प्रीमियम वायरलेस एप्लिकेशन प्रोटोकॉल (WAP) सर्विसेजसाठी साइन अप करू शकेल.

जेव्हा मेलवेअर एप्सच्या माध्यमातून तुमच्या डिवाइसमध्ये प्रवेश करतं तेव्हा ते विविध प्रकारे काम करतं. यामुळे तुमच्यासोबत आर्थिक फ्रॉड देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या एप्सपासून सावध राहिलं पाहिजे. 

Zscaler संशोधकांच्या मताप्रमाणे, गेल्या काही महिन्यांमध्ये एँड्रॉइड एप्समध्ये 50 पेक्षा जास्त जोकर पेलोड्सला डिटेक्ट करण्यात आलं आहे. या मेलवेयर्सने खासकरून हेल्थ आणि फिटनेसशी निगडीत एप्सला टारगेट केलं आहे. त्याचसोबत फोटोग्राफी, टूल्स आणि कम्युनिकेशन कॅटेगरीही निशाण्यावर आहेत. संशोधकाच्या म्हणण्याप्रमाणे, मेलवेयर्सचे पब्लिशर्स Google Playची चाचणी प्रक्रिया आणि सुरक्षितता यंत्रणा टाळण्यासाठी त्यांच्या पद्धतीत बदल करतायत. 

हे अॅप्स फोनमध्ये ठेऊ नका. जरी हे एप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर त्वरीत काढून टाका-

Translate Free, PDF Converter Scanner, Delux Keyboard, Saying Message, Free Affluent Message, Comply QR Scanner, PDF Photo Scanner, Font Style Keyboard, Private Message, Read Scanner, Print Scanner .