तुम्ही पाहिली का दोन्ही बाजूने चालणारी 'ही' कार....?

ही कार पाहुन तुम्हाला नक्कीच आर्श्चय वाटेल. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 30, 2018, 04:03 PM IST
तुम्ही पाहिली का दोन्ही बाजूने चालणारी 'ही' कार....? title=

नवी दिल्ली : ही कार पाहुन तुम्हाला नक्कीच आर्श्चय वाटेल. कारण ही कार दोन्ही बाजूने चालते. राईट! तुम्ही बरोबर ऐकले आहे. टू फेस कार म्हणजे दोन्ही बाजूने चालणारी कार. एका ७१ वर्षांच्या इंडोनेशियातील मेक्यानिकने ही कार डिझाईन केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अतिशय दुर्मीळ

इंडोनेशियातील वेस्ट जावा प्रोव्हिन्सची राजधानी बंडुग येथील रोनी गुनावन यांनी ही दोन्ही बाजूने चालणारी कार तयार केली आहे. हे अतिशय दुर्मीळ आहे.

कारची खासियत

'bizarre' या कारला दोन इंजिन्स, दोन स्टेयरिंग व्हिल्स, दोन पेडल्स, दोन गियर सेट्स आणि एक गॅस टॅंक आहे. त्याचप्रमाणे एकाच वेळी दोन्ही ड्रायव्हर्स व्हिल्स कंट्रोल करू शकतील अशा पद्धतीने ती कार डिझाईन करण्यात आली आहे.
ही कार बनवण्यासाठी सहा महिने लागले. मेक्यानिकने १० वर्ककर्सच्या मदतीने ही कार तयार  केली आहे.

रस्त्यावर चालवण्यास मनाई

रोनीचे हे क्रिएशन अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. एक अनोखी कार चालवण्याचे त्याचे स्वप्न त्याने सत्यात उतरवले आहे. मात्र ती कार लोकल ट्रफीकचे नियम पाळण्यास असमर्थ ठरेल.

सिनियर ट्रफिक पोलीस ऑफिसर हिलमन रावलसी यांनी सांगितले की, ही कार इंडोनेशियातील ट्रफिकच्या नियमांचे उल्लंघन करेल. कारला रिर्व्हस लाईट आणि डायमेन्शस नाहीत. त्याचबरोबर कारच्या मालकाने कारचा आकार किंवा रंग बदल्यासाठी हवे असलेले लायसन्स घेतलेले नाही. तसंच कारला दोन नंबर प्लेट्स आहेत आणि त्या दोन नंबर्सवर दोन वेगवेगळ्या कारचे रजिस्ट्रेशन झालेले आहे. त्यामुळे ही कार रस्तावर चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसा करार आम्ही कार मालकाशी केला आहे.