नवी दिल्ली : अमेरिकन मोबाईल फोन निर्माता कंपनी इनफोकसनं बुधवारी भारतात दोन नवे स्मार्टफोन दाखल केलेत. टर्बो ५ प्लस आणि स्नॅप ४ असे हे दोन स्मार्टफोन आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, इनफोकस स्नॅप फोनमध्ये कंपनीनं चार कॅमेरे दिलेत. फोटोग्राफी स्पेशल अशा या स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजुला १३ मेगापिक्सल आणि ८ मेगापिक्सल कॅमेराचं सेटअप आहे. तर पुढच्या बाजुलाही ८ मेगापिक्सल आणि ८ मेगापिक्सलच्या दोन कॅमेऱ्यांचं सेटअप दिलंय.
बॅक कॅमेऱ्यासोबतच ड्युएल एलईडी फ्लॅशही आहे. हा एक ड्युएल सिम स्मार्टफोन आहे जो अँन्ड्रॉईड ७.० नूगावर चालतो. याच्या मॅटेलिक बॉडीत ४ जीबी रॅम आणि ऑक्टाकोर मीडियाटेक प्रोसेसर आहे. यात ५.२ इंचाचा फूल एचडी डिस्प्ले देण्यात आलाय. ३००० mAH ची बॅटरी आणि होम बटनवर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलाय.
तर बॅटरी लाईफवर फोकस करत इनफोकसनं टर्बो ५ प्लस लॉन्च करण्यात आलाय. यामध्ये ४९५० mAH बॅटरी देण्यात आलीय. टर्बो ५ प्रमाणे यातही मागच्या बाजुला १३ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर पुढच्या बाजुला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
हे दोन्ही फोन फोरजी एलटीई नेटवर्कला सपोर्ट करतात. टर्बो ५ प्लसची किंमत ८,९९९ रुपये आणि स्नॅप ४ ची किंमत ११,९९९ रुपये निर्धारित करण्यात आलीय. लवकरच हे दोन्ही फोन अमेझॉनवर दाखल होतील.