भारतात आयफोन १० ची विक्री सुरू

आजपासून भारतात आयफोन टेनची विक्री सुरु 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 3, 2017, 07:44 PM IST
भारतात आयफोन १० ची विक्री सुरू title=

मुंबई : आयफोन चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून भारतात आयफोन टेनची विक्री सुरु झाल्याने आयफोन घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अलिकडेच अॅपलनं आयफोन टेनची घोषणा केली होती. भारतासोबत अमेरिकेतही आजपासूनच आयफोन  टेन उपलब्ध होत आहे.

 २७ ऑक्टोबरपासून विविध ई कॉमर्स वेबसाइटवर या फोनचं ऑनलाइन बुकिंग सुरू झाले आहे. आता त्याची अधिकृत रिटेल विक्री सुरू होत आहे.

 या फोनच्या किंमतीबाबत आणि फिचर्सबाबत अॅपलप्रेमींना सगळ्यांनाच उत्सूकता आहे. आयफोन टेनमध्ये काय नवीन फिचर्स आहेत.