कॅमेरा, रंगासकट सगळंकाही हुबेहूब iPhone सारखं; फक्त 5699 रुपयांना मिळणारा हा फोन कोणता?

iPhone : सप्टेंबर महिन्यामध्ये लाँच होणाऱ्या आयफोनच्या नव्या व्हेरिएंटची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. त्यातच भर पडलीये ती म्हणजे एका अशा फोनची ज्यानं टेकप्रेमींनाही चक्रावून सोडलं आहे.   

सायली पाटील | Updated: Aug 13, 2024, 03:09 PM IST
कॅमेरा, रंगासकट सगळंकाही हुबेहूब iPhone सारखं; फक्त 5699 रुपयांना मिळणारा हा फोन कोणता?  title=
iPhone look alike itel A50C features and price latest tech news

iPhone : आयफोनप्रेमींचा आणि युजर्सचा आकडा सध्या इतक्या झपाट्यानं वाढला आहे की, 10 मधील 4 मोबाईल युजर्सच्या हातात हा अॅपलचा कमाल फोन पाहायला मिळत आहे. विविध ई कॉमर्स साईटवर मिळणाऱ्या सवलती आणि इतर अनेक ऑफरमुळं आयफोन खरेदी करणं किंवा तो EMI सारखे पर्याय वापरून विकत घेण्याचा ट्रेंड मागील काही वर्षांमध्ये वाढला आहे. असं असतानाच एक वर्ग असाही आहे ज्यांना हा फोन अद्यापही परवडत नाही. 

गगनाला भिडणारे आयफोनचे दर आजही अनेकांच्या आवाक्याबाहेरचे असून, अशा सर्वच मंडळींसाठी एक Good News. कारण, रंगापासून कॅमेरापर्यंत आणि एकंदर लूकपर्यंत अगदी आयफोनसारखाच दिसणार आणि त्याहून अनेक पटींनी कमी किंमत असणारा itel A50C या फोनची सीरिज नुकतीच भारतात लाँच झाली आहे. 

itel A50 आणि itel A50C असे दोन फोन कंपनीनं भारतात लाँच केले असून, सर्व स्मार्टफोन फिचर या फोनमध्ये उपलब्ध आहेत. फोनमध्ये ऑक्टा कोर Unisoc प्रोसेसर, Android Go सॉफ्टवेअर आणि 6.6 इंचांचा एचडी स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. 

नव्यानं लाँच झालेला हा फोन आणि त्याहूनही त्याची मागची बाजू पाहिली असता एका क्षणासाठी हा आयफोनच असल्याचं लक्षात येतं. हा एक एंट्री लेवल स्मार्टफोन आहे. itel A50C सफायर ब्लॅक, डॉन ब्लू आणि मिस्टी अॅक्वा अशा रंगांमध्ये उपलब्ध असून, या फोनची किंमत 5699 रुपये इतकी आहे. itel A50 हे मॉडेल मिस्ट ब्लॅक, लाईम ग्रीन, स्यान ब्लू आणि गोल्ड अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे. 

हेसुद्धा वाचा : स्पोर्ट्स बाईकलाही लाजवतोय Royal Enfield Classic 350 चा नवा लूक; नव्या फिचर्ससह किती बदलली बाईक? 

3GB RAM + 64 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6099 पर्यंत जात असून, फोनचा 4GB RAM + 64 GB व्हेरिएंटची किंमत 6499 रुपये इतकी आहे. अॅमेझॉनवर हा फोन ऑनलाईन पद्धतीनं खरेदी करण्याची मुभा युजर्सना देण्यात आली आहे. 5000mAh इतकी बॅटरी पॉवर असणाऱ्या या फोनला 10W चा USB Type C चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. 4G VOLTE, ड्युअल बँक WiFi आणि स्मार्टफोनमधील इतर अनेक फिचर देण्यात आले आहेत.