IPL प्रेमींसाठी Jioचा नवा धमाका, फ्रीमध्ये मिळणार ही सुविधा

इंडियन प्रीमियर लीग येत्या ७ एप्रिलपासून सुरु होतेय. आयपीएलची भारतातील क्रेझ पाहता दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने बुधवारी नव्या लाईव्ह मोबाईल गेम आणि क्रिकेट कॉमेडी शोची घोषणा केली. कंपनीने स्पेशल पॅक लाँच केलाय. यात २५१ रुपयांत ५१ दिवसांसाठी जिओ टीव्हीवर लाईव्ह मॅच पाहता येणार आहेत. या पॅकमध्ये १०२ जीबी डेटा आहे. हा लाईव्ह मोबाईल गेम जिओ क्रिकेट प्ले लॉगला देशातील कोणत्याही स्मार्टफोनवर खेळता येणार आहे. ११ भाषांमध्ये ७ आठवडे ६० सामने असतील. कंपनीच्या माहितीनुसार, या गेममध्ये विजेत्यांना मुंबईत घर, २५ कार आणि कोट्यवधी रुपये रोख रकमेची बक्षिसे मिळणार आहेत. 

Updated: Apr 5, 2018, 10:17 AM IST
IPL प्रेमींसाठी  Jioचा नवा धमाका, फ्रीमध्ये मिळणार ही सुविधा title=

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग येत्या ७ एप्रिलपासून सुरु होतेय. आयपीएलची भारतातील क्रेझ पाहता दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने बुधवारी नव्या लाईव्ह मोबाईल गेम आणि क्रिकेट कॉमेडी शोची घोषणा केली. कंपनीने स्पेशल पॅक लाँच केलाय. यात २५१ रुपयांत ५१ दिवसांसाठी जिओ टीव्हीवर लाईव्ह मॅच पाहता येणार आहेत. या पॅकमध्ये १०२ जीबी डेटा आहे. हा लाईव्ह मोबाईल गेम जिओ क्रिकेट प्ले लॉगला देशातील कोणत्याही स्मार्टफोनवर खेळता येणार आहे. ११ भाषांमध्ये ७ आठवडे ६० सामने असतील. कंपनीच्या माहितीनुसार, या गेममध्ये विजेत्यांना मुंबईत घर, २५ कार आणि कोट्यवधी रुपये रोख रकमेची बक्षिसे मिळणार आहेत. 

मायजिओ अॅप कॉमेडी शो

मायजियो एप आएगा कॉमेडी शो जियो 'धन धना धन लाइव' मायजिओ अॅपवर दाखवला जाईल. हा शो जिओ आणि इतर ग्राहकांसाठी निशुल्क उपलब्ध असणार आहे. याची सुरुवात ७ एप्रिलला होईल. या शोचे निवेदन सुनील ग्रोव्हर आणि समीर कोचर करतील. यात अनेक बड्या व्यक्ती सहभागी होणार आहेत. 

रिलायन्स जिओ पेमेंट बँक 

रिलायन्स जिओने आपले पेमेंट बँक सुरु केलीये. बुधवारपासून जिओ पेमेंट बँकेचे काम सुरु होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिलीये. रिलायन्स इंडस्ट्रीज त्या ११ अर्जदारांपैकी आहे ज्यांनी ऑगस्ट २०१५मध्ये पेमेंट बँकेच्या स्थापनेला सैद्धान्तिक मंजुरी मिळाली होती.

एअरटेल -पेटीएम बँक टक्कर

जिओ पेमेंट बँक सुरु होण्यामुळे एअरटेल-पेटीएमच्या पेमेंट बँकेला टक्कर मिळणार आहे. टेलिकॉम क्षेत्रातील भारती एअरटेलने नोव्हेंबर २०१६मध्ये सगळ्यात पहिल्यांदा पेमेंट बँक सुरु केली होती.. त्यानंतर पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्माच्या पेटीएम पेमेंट बँकेची सुरुवात मे २०१७मध्ये झाली होती. याशिवाय इतक कंपन्यांनीही पेमेट बँक सुरु केल्या. मात्र जिओची पेमेंट बँक सुरु झाल्याने इतर पेटीएम बँकांना टक्कर मिळणार आहे. 

रिलायन्स जिओ पहिल्यापासून टेलिकॉम सेक्टरमध्ये आपली मजबूत पकड बनवलीये. फ्री व्हॉईस कॉल आणि डेटाच्या माध्यमातून आपला यूझर बेस मजबूत केलाय. जिओकडे तब्बल १२ कोटी यूझर्स आहेत. कंपनीने प्राईम मेंबरशिपची मुदतही एक वर्षांनी वाढवलीये. असं म्हटलं जातय की आता कंपनी पेमेंट बँक सुरु केल्यानंतर बँकिंग क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय.

मिळणार हे फायदे

पेमेंट बँकेत कोणीही बचत खाते खोलू शकतात.
या अकाऊंटमध्ये एक लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करण्याची सुविधा आहे. 
पेमेंट बँकेतून डेबिड कार्डही मिळू शकते
पेमेंट बँकेकडे ग्राहकांसाठी सामान्य फायनान्शिअल प्रॉड्क्ट जसे म्युच्युअल फंड आणि इश्युरन्स प्रॉडक्ट्सचेही ऑप्शन आहेत.

व्यापाऱ्यांना मिळणार फायदा

छोट्या व्यापाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे.
पेमेंच बँकेद्वारे ५-६ कर्मचारी संख्या असलेल्या बिझनेससाठी पेमेंट बँकेत सॅलरी अकाऊंट उघडले जाऊ शकते.
पेमेंट बँकेतून मोबाईलच्या माध्यमातून बँकिंग करणे सोपे जाते. 

असे खोलू शकता अकाऊंट

सगळ्यात आधी तुम्ही जिओ पेमेंट बँकचे अॅप इन्स्टॉल करा आणि जिओ नंबरशी साईन इन करा. 
निश्चित जागेवर आपला आधारनंबर एंटर करा आणि आधार लिंक करा.
जर डेबिट वा एटीएम कार्ड हवे असेल तर अॅड्रेस अपडेट करा.
पेमेंट बँक अकाऊंटसाठी कस्टमर एक्झिक्युटिव्ह तपासणीसाठी फिजीकल व्हेरिफिकेशन आणि अंगठ्याचा निशाणा म्हणजे ईकेवायसीसाठी तुमच्या घरी येतील.
जिओ पेमेंट बँकेच्या अधिकृत सेंटरवर जाऊनही तुम्ही व्हेरिफिकेशन करु शकता.